• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे तंबाखूमुक्तीची शपथ; व्यसनमुक्तीचा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे तंबाखूमुक्तीची शपथ; व्यसनमुक्तीचा संदेश
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

शिरोळ तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, शेडशाळ येथे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर जिल्हा आणि विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखूमुक्ती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देऊन व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

कार्यक्रमात विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक रियाज जमादार यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. तंबाखू, जर्दा, खर्रा, बिडी, सिगारेट, ई-हुक्का, ई-सिगारेट यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचा तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे होणाऱ्या आजारांविषयी जनजागृती करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपले घर, शाळा, कार्यालय, गाव आणि परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची प्रतिज्ञा केली. तसेच भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा २००३ आणि महाराष्ट्र शासनाच्या तंबाखूजन्य पदार्थांवरील प्रतिबंधात्मक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जागरूक राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

क्रीडाश्री अब्दुल कादर देसाई यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. तंबाखूजन्य पदार्थांपासून स्वतः दूर राहून इतरांनाही त्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

याच कार्यक्रमात रियाज जमादार यांची शिरोळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्था, कुरुंदवाड येथे उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल हळींगळे यांनी केले, तर मनोज पासोबा यांनी आभार मानले.

यावेळी पद्मावती घाट, संगीता भोसले, गणेश खिलारे, राजू जमादार, महेश गंगधर, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“तंबाखूमुक्त शाळा, निरोगी समाज” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

मऱ्हळ बु. येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

कै. संजय खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव; भैरववाडीत भक्तिमय वातावरण

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
15
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
21
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post
कै. संजय खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव; भैरववाडीत भक्तिमय वातावरण

कै. संजय खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव; भैरववाडीत भक्तिमय वातावरण

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In