• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कै. संजय खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव; भैरववाडीत भक्तिमय वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
कै. संजय खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव; भैरववाडीत भक्तिमय वातावरण
0
SHARES
64
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी

श्री पंचगंगा एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, अमोल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तसेच विठ्ठल मंदिर भैरववाडी वारकरी सांप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. श्री संजय आण्णासो खोत (माजी नगराध्यक्ष) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव दि. ३ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत भैरववाडी येथे भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

या महोत्सवात दररोज पहाटे ५ ते ६ वाजता काकडा आरती, सकाळी ६ ते ७ वाजता श्रींची पूजा-अर्चा, सकाळी ७ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ वाजता हरिपाठ आणि सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत कीर्तन सेवा आयोजित करण्यात येत आहे.

कीर्तन सेवेसाठी मान्यवर कीर्तनकारांची उपस्थिती

  • ३ जून (बुधवार) – ह.भ.प. किशोर भाट (कुरुंदवाड)
  • ४ जून (गुरुवार) – ह.भ.प. ईश्वर महाराज सुतार (बुर्ली)
  • ५ जून (शुक्रवार) – ह.भ.प. हनुमंत महाराज पवार (अभयनगर)
  • ६ जून (शनिवार) – ह.भ.प. अनिल महाराज फल्ले (कराड)
  • ७ जून (रविवार) – भागवताचार्य ह.भ.प. विष्णू महाराज चामनर (कराड)
  • ८ जून (सोमवार) – ह.भ.प. संजय महाराज काशीद (कारदगा)
  • ९ जून (मंगळवार) – ह.भ.प. सुभाष शिंगे महाराज (नागांव)

सेवेकरी मंडळी

या धार्मिक सोहळ्यात व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. बाळासाहेब शिंदे तारदाळकर, चोपदार म्हणून संजय चव्हाण (नांदणी), विणेकरी म्हणून बाबासाहेब रायमाने (नांदणी), मृदंगाचार्य म्हणून शीतल चव्हाण (मजरेवाडी) व कुमार जाधव, गायनाचार्य म्हणून किशोर भाट, गजानन कदम व संजय काटे, तर हार्मोनियम साथीसाठी पांडुरंग सासपडे व कपिल तराळ सेवा देत आहेत.

याशिवाय भजन वेडे ग्रुप, शिरोळ तालुका, तसेच कुरुंदवाड व भैरववाडीतील टाळकरी व वारकरी मंडळी भजन व साथसंगत करीत आहेत.

या महोत्सवाचे संयोजन डॉ. सुनील चव्हाण (माजी नगराध्यक्ष, कु.न.पा.) तसेच अमोल गणेश मंडळातील सर्व सदस्यांनी केले आहे.

अमोल गणेश मंडळ चौक, चव्हाण मळा, भैरववाडी येथे सुरू असलेल्या या सप्ताहात परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.

Previous Post

न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे तंबाखूमुक्तीची शपथ; व्यसनमुक्तीचा संदेश

Next Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; स्वच्छता दूतांचा विशेष सत्कार

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
16
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; स्वच्छता दूतांचा विशेष सत्कार

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; स्वच्छता दूतांचा विशेष सत्कार

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In