• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; स्वच्छता दूतांचा विशेष सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; स्वच्छता दूतांचा विशेष सत्कार
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथे विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच स्वच्छता राखण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या स्वच्छता दूतांचा विशेष सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जे. पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्र सेवा दलाचे बाबासाहेब नदाफ उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन बाबासाहेब नदाफ यांनी केले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य आर. जे. पाटील यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन हरित आणि स्वच्छ परिसर निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, असे सांगितले.

कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्वच्छता दूतांचा प्रशासनाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमास शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

“वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि स्वच्छ पर्यावरण घडवा” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

कै. संजय खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव; भैरववाडीत भक्तिमय वातावरण

Next Post

घातपातातील मृतकाची ओळख पटली; मारेगाव पोलिसांनी २४ तासांत तीन आरोपींना घेतले ताब्यात

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
15
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post
घातपातातील मृतकाची ओळख पटली; मारेगाव पोलिसांनी २४ तासांत तीन आरोपींना घेतले ताब्यात

घातपातातील मृतकाची ओळख पटली; मारेगाव पोलिसांनी २४ तासांत तीन आरोपींना घेतले ताब्यात

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In