• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची वरवटी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोशाळेला भेट; सेंद्रिय शेती व आयुर्वेदिक उत्पादन उपक्रमांचे उद्घाटन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

अंबाजोगाई | प्रतिनिधी

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाई-परळी मार्गावरील वरवटी येथील लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे गोशाळेला भेट देत तेथील विविध शेती व समाजोपयोगी आयुर्वेदिक उत्पादन उपक्रमांचे उद्घाटन केले. या भेटीदरम्यान त्यांनी गोशाळेच्या कार्याचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचनाही दिल्या.

RelatedPosts

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

वरवटी येथे ॲड. अशोक मुंडे यांनी गेल्या दशकाहून अधिक काळापासून गोसंवर्धन व गोरक्षणाच्या उद्देशाने ही गोशाळा उभी केली आहे. गोशाळेत केवळ गोसंवर्धनच नव्हे तर गोमूत्र व शेणापासून सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त उत्पादने, तसेच विविध आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने व दैनंदिन वापरातील वस्तू तयार करण्याचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोशाळेतील उपक्रमांची माहिती घेत सेंद्रिय शेतीचा प्रसार, गोसंवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अशा प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले. वाढत्या रासायनिक शेतीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक उत्पादनांकडे वळण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या भेटीत मंत्री महोदयांसोबत माजी खासदार प्रीतम मुंडे, तसेच लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या धर्मपत्नी श्रीमती प्रज्ञाताई मुंडे उपस्थित होत्या. मुंडे परिवाराच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले.

गोशाळेचे संस्थापक ॲड. अशोक मुंडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने सुरू केलेल्या या गोशाळेत त्यांच्या कुटुंबीयांचे आगमन होणे हा आमच्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे. आज प्रज्ञाताई मुंडे यांच्या उपस्थितीमुळे जणू साहेब स्वतःच गोशाळेला भेट दिल्याची भावना निर्माण झाली.”

यावेळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, स्थानिक नागरिक, गोभक्त आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोसंवर्धन, सेंद्रिय शेती आणि आयुर्वेदिक उत्पादनांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Previous Post

घातपातातील मृतकाची ओळख पटली; मारेगाव पोलिसांनी २४ तासांत तीन आरोपींना घेतले ताब्यात

Next Post

शिरूरमधील अतिक्रमण कारवाईत दुजाभावाचा आरोप; कानोबा मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी

Related Posts

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ
Blog

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

September 12, 2026
28
Blog

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

September 12, 2026
11
रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान
Blog

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 12, 2026
17
मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….
Blog

मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….

September 12, 2026
55
Blog

अंगणवाडी गुणवत्ता यादीवर आक्षेप; ४ अतिरिक्त गुणांची चौकशी करण्याची मागणी

September 12, 2026
48
Blog

गायनातून कोणत्याही प्रकारचा इन्कम घेतला असाल तर अश्या व्यक्तींना सहभाग घेता येणार नाही.

September 12, 2026
7
Next Post
शिरूरमधील अतिक्रमण कारवाईत दुजाभावाचा आरोप; कानोबा मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी

शिरूरमधील अतिक्रमण कारवाईत दुजाभावाचा आरोप; कानोबा मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

September 12, 2026

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

September 12, 2026
रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In