• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर वर्धा पोलिसांची धडक कारवाई; जिल्हाभर विशेष मोहीम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर वर्धा पोलिसांची धडक कारवाई; जिल्हाभर विशेष मोहीम
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ जून २०२६ रोजी जिल्हाभर नाकाबंदी आणि तपासणी मोहीम राबविण्यात आली.

RelatedPosts

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

या मोहिमेदरम्यान वर्धा शहरातील इतवारा चौक येथे मार्शल पेट्रोलिंग पथकाने दोन वाहनचालकांना दारूच्या नशेत वाहन चालविताना पकडले. वाहन क्रमांक एमएच-३२ एएम-५५३३ चे चालक प्रशांत देवराव आमटे (वय ४५, समतानगर, वर्धा) यांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण १०५.० मिग्रॅ आढळून आले. तसेच वाहन क्रमांक एमएच-३२ झेड-८९३६ चे चालक श्रीधर प्रमोद गाडेकर (वय ३२, वाटखेडा, ता. देवळी) यांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण २३५.५ मिग्रॅ आढळले.

दोन्ही वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच त्यांच्याकडे वैध वाहन परवाना नसल्याने कलम ३(१), १८१/१७७ अंतर्गत अतिरिक्त कारवाई करण्यात आली.

याशिवाय जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनीही विशेष तपासणी मोहीम राबवून दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई केली. आर्वी, सिंदी, हिंगणघाट आणि सेवाग्राम पोलीस ठाण्यांनी प्रत्येकी एक अशा चार वाहनचालकांविरुद्ध कलम १८५ अन्वये गुन्हे दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२६ मध्ये आतापर्यंत जिल्ह्यात ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’च्या एकूण १५० केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. तसेच ४५ परवाना निलंबन प्रस्ताव पाठविण्यात आले असून हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर १,२०२ कारवाया करण्यात आल्या आहेत. अवैध प्रवासी वाहतुकीच्या ९३ प्रकरणांवरही कारवाई करण्यात आली आहे.

वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने नागरिकांना दारू पिऊन वाहन चालवू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा तसेच चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

“रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा,” असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी केले आहे.

Previous Post

पाण्याच्या प्रत्येक थेंबातून वाहणार स्मृतींचा ओलावा; कै. निळकंठराव भारती यांना अनोखी श्रद्धांजली

Next Post

सयोग बिल्डर्स प्रकरणातील ४१७ गुंतवणूकदारांना दिलासा; ५२.७३ लाखांची मालमत्ता जप्त

Related Posts

Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
27
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
11
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
4
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
1
Blog

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजना तातडीने सुरू करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा

September 10, 2026
5
Blog

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026
3
Next Post

सयोग बिल्डर्स प्रकरणातील ४१७ गुंतवणूकदारांना दिलासा; ५२.७३ लाखांची मालमत्ता जप्त

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In