• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेत फिनिक्स जी-चॅम्प अबॅकसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेत फिनिक्स जी-चॅम्प अबॅकसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

नळदुर्ग | प्रतिनिधी

नळदुर्ग येथील फिनिक्स जी-चॅम्प अबॅकस अँड कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी भाग्यनगर (हैदराबाद) येथे आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत नळदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला आहे.

RelatedPosts

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

या स्पर्धेत प्रेम प्रतापसिंग हजारे याने सलग तिसऱ्यांदा अबॅकस चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. तसेच आस्तिक सतीश खांडेकर आणि शशांक संतोष धोत्रे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत इंटरनॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन विनर म्हणून यश संपादन केले.

प्रेम हजारे याने राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण सहभाग नोंदवत यशाची नवी उंची गाठली आहे. आपल्या जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला.

या यशामागे फिनिक्स जी-चॅम्प अबॅकस अँड कोचिंग क्लासेसचे संस्थापक सुरज संभाजी कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना दिलेल्या उत्कृष्ट प्रशिक्षणाची दखल घेत त्यांना सलग चौथ्यांदा “बेस्ट इंटरनॅशनल अबॅकस टीचर अवॉर्ड” प्रदान करण्यात आला. या दुहेरी यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी प्रेम प्रतापसिंग हजारे म्हणाला, “फिनिक्स जी-चॅम्प अबॅकस क्लासमुळे माझा आत्मविश्वास, एकाग्रता आणि गणिती कौशल्ये विकसित झाली. सुरज कांबळे सरांचे मार्गदर्शन, प्रेरणा आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे मला हे यश मिळाले. प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले तर यश निश्चित मिळते.”

प्रेम हजारे यांचे वडील प्रतापसिंग हजारे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “फिनिक्स जी-चॅम्प अबॅकस क्लास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी उत्कृष्ट संस्था आहे. सुरज कांबळे सर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि स्पर्धात्मकता निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या मुलाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळाले, याचा आम्हाला अभिमान वाटतो.”

फिनिक्स जी-चॅम्प अबॅकस अँड कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून नळदुर्गमध्ये गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण होत असून येथील विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने यश मिळवत आहेत. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नळदुर्गचे नाव देशभरात गौरवाने घेतले जात असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Previous Post

हिंगणी व धामणगाव येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Next Post

मुख्य जलवाहिनी फुटल्याने रिसोडचा पाणीपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

Related Posts

ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
65
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
1
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
0
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
1
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
1
ताज्या घडामोडी

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

September 10, 2026
5
Next Post
मुख्य जलवाहिनी फुटल्याने रिसोडचा पाणीपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

मुख्य जलवाहिनी फुटल्याने रिसोडचा पाणीपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In