• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घरगुती नळांवर मोटार पंपांचा वापर; मारेगावमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
घरगुती नळांवर मोटार पंपांचा वापर; मारेगावमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

मारेगाव प्रतिनिधी :

मारेगाव नगरपंचायत हद्दीतील विविध भागांमध्ये घरगुती नळांना मोटार पंप लावून पाणी ओढून घेतले जात असल्याने इतर नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

मारेगाव शहरात एकूण १७ प्रभाग (वार्ड) असून अनेक ठिकाणी घरगुती तसेच सार्वजनिक नळांची व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपंचायतीकडून ठरावीक वेळेत प्रत्येक वार्डमध्ये पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अनेक नागरिकांच्या नळांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

यामागील प्रमुख कारण म्हणजे काही नागरिकांनी आपल्या घरगुती नळांवर मोटार पंप बसवून थेट पाणी ओढून घेण्याची पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे जलवाहिन्यांमधील दाब कमी होऊन इतर भागांतील नागरिकांना पाणी मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. हा प्रकार शहरातील अनेक वार्डांमध्ये सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि वाढत्या तापमानामुळे आधीच पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असताना अशा प्रकारांमुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. अनेकांना पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी मिळत नसल्याने दूरवरून पाणी आणण्याची वेळ येत आहे.

प्रत्येक नागरिकाला समान व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी शासनाने विविध पाणीपुरवठा योजना राबविल्या आहेत. मात्र काही नागरिकांकडून मोटार पंपांचा गैरवापर करून पाणी ओढले जात असल्याने या योजनांच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. हा प्रकार नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास का येत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन घरगुती व सार्वजनिक नळांवर बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेल्या मोटार पंपांवर कारवाई करावी तसेच सर्व नागरिकांना समान प्रमाणात पाणीपुरवठा मिळेल यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मारेगावकरांनी केली आहे.

Previous Post

कै. शांताराम भोसले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त २५१ आंबा रोपांचे वाटप

Next Post

वारंवार खंडित वीजपुरवठ्याने कोपरगाव तालुका त्रस्त; महावितरणाविरोधात नागरिकांमध्ये नाराजी

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
12
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
12
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
4
Next Post

वारंवार खंडित वीजपुरवठ्याने कोपरगाव तालुका त्रस्त; महावितरणाविरोधात नागरिकांमध्ये नाराजी

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In