• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाडमधील उपाध्ये व गोलंदाज कॉलनीतील गटारी व रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांची तातडीच्या कामांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in Blog
0
कुरुंदवाडमधील उपाध्ये व गोलंदाज कॉलनीतील गटारी व रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांची तातडीच्या कामांची मागणी
0
SHARES
96
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

कुरुंदवाड नगरपरिषद हद्दीतील औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या उपाध्ये व गोलंदाज कॉलनी परिसरातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधांच्या अभावामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पक्के रस्ते व गटारी नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सन 1883 मध्ये स्थापन झालेल्या कुरुंदवाड नगरपरिषदेला 143 वर्षांचा इतिहास लाभला आहे. आगामी सात वर्षांत ही नगरपरिषद शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश करणार असताना शहरातील काही भाग अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र दिसून येत आहे. उपाध्ये व गोलंदाज कॉलनीतील रहिवाशांना सार्वजनिक पक्के रस्ते, गटारी आणि इतर नागरी सुविधांचा अभाव भेडसावत आहे.

महाराणा प्रताप चौक परिसरातील रस्त्याची अवस्था विशेषतः चिंताजनक बनली आहे. बस्तवाड-मजरेवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी इचलकरंजी महानगरपालिकेकडून रस्ता खोदण्यात आला होता. मात्र काम पूर्ण होऊन वर्ष उलटूनही रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकदा अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.

सदर रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी नगरपालिकेची की जिल्हा परिषदेची, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी जबाबदारी नगरपालिकेकडे असल्याचे सांगितल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

कुरुंदवाडची लोकसंख्या सुमारे 40 हजारांच्या घरात पोहोचली असून दरवर्षी त्यात वाढ होत आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नागरी सुविधांचा विकास अपेक्षित प्रमाणात झालेला नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने गटारी नसल्यामुळे घरांसमोर व रस्त्यांवर पाणी साचण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

उपाध्ये व गोलंदाज कॉलनी परिसरातील पक्के रस्ते व गटारींची कामे विशेष निधीतून हाती घेऊन ती लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्षा, मुख्याधिकारी आणि संबंधित प्रशासनाकडे केली आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

जामखेड तालुक्यातील मतेवाडीला मुसळधार पावसाचा तडाखा; शेतशिवारात पाणी, गल्लीबोळ जलमय

Next Post

कै. संजय आण्णासो खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
कै. संजय आण्णासो खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

कै. संजय आण्णासो खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In