• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कै. संजय आण्णासो खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in Blog
0
कै. संजय आण्णासो खोत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
0
SHARES
126
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी

श्री पंचगंगा एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, अमोल कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तसेच विठ्ठल मंदिर भैरववाडी वारकरी सांप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. संजय आण्णासो खोत (माजी नगराध्यक्ष) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेला ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सव यावर्षीही भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. दि. ३ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत भैरववाडी येथे हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

महोत्सवादरम्यान दररोज पहाटे ५ ते ६ वाजता काकडा आरती, सकाळी ६ ते ७ वाजता श्रींची पूजा-अर्चा, सकाळी ७ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ वाजता हरिपाठ आणि सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात अध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

कीर्तन सेवेसाठी विविध मान्यवर कीर्तनकारांनी उपस्थित राहून आपल्या प्रभावी कीर्तनातून अध्यात्म, संस्कार आणि भक्तीचे महत्त्व भाविकांसमोर मांडले. जीवनाचा खरा आनंद भक्तीमार्गात आणि नामस्मरणात असल्याचे विविध दाखले देत कीर्तनकारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या धार्मिक सोहळ्यात व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प. बाळासाहेब शिंदे तारदाळकर यांनी जबाबदारी सांभाळली. चोपदार म्हणून संजय चव्हाण (नांदणी), विणेकरी म्हणून बाबासाहेब रायमाने (नांदणी), मृदंगाचार्य म्हणून शीतल चव्हाण (मजरेवाडी) व कुमार जाधव यांनी सेवा दिली. तसेच गायनाचार्य म्हणून किशोर भाट, गजानन कदम व संजय काटे, तर हार्मोनियम साथीसाठी पांडुरंग सासपडे व कपिल तराळ यांनी सुरेल साथ दिली.

याशिवाय शिरोळ तालुक्यातील भजन वेडे ग्रुप तसेच कुरुंदवाड व भैरववाडी येथील टाळकरी आणि वारकरी मंडळींनी भजन, नामस्मरण व साथसंगतीद्वारे कार्यक्रमाची शोभा वाढवली.

अमोल गणेश मंडळ चौक, चव्हाण मळा, भैरववाडी येथे आयोजित या सप्ताहात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सात दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

या महोत्सवाचे संयोजन डॉ. सुनील चव्हाण (माजी नगराध्यक्ष, कुरुंदवाड नगरपरिषद) तसेच अमोल गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले. त्यांच्या नियोजनबद्ध आणि परिश्रमपूर्वक केलेल्या कार्यामुळे महोत्सव यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.

Previous Post

कुरुंदवाडमधील उपाध्ये व गोलंदाज कॉलनीतील गटारी व रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांची तातडीच्या कामांची मागणी

Next Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५०० फळझाडांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५०० फळझाडांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५०० फळझाडांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In