• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बँकॉकच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांचा दुहेरी सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
बँकॉकच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांचा दुहेरी सन्मान
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

जामखेड | प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील सुपुत्र तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर संलग्नित योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील प्राणीशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी, युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक रणजित रावसाहेब राऊत यांनी थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित १० व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उल्लेखनीय यश संपादन करत दुहेरी मानाचा बहुमान मिळविला आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

त्यांना “एक्सलन्स इन एन्व्हायर्नमेंटल सस्टेनेबिलिटी अवॉर्ड – २०२६” (उत्कृष्ट पर्यावरणीय शाश्वतता पुरस्कार) तसेच संशोधन सादरीकरणासाठी मौखिक सादरीकरणाचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२६ रोजी आशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (AIT), बँकॉक येथे आयोजित “क्लायमेट स्मार्ट नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट फॉर सस्टेनेबल ॲग्रीकल्चर अँड अलाइड सायन्सेस” या आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान हा सन्मान प्रदान करण्यात आला.

ढाका (बांगलादेश) येथील डॉ. बिनय कुमार चक्रवर्ती, रायचूरचे डॉ. रमेश राठोड, जयपूरचे डॉ. उपेंद्र सिंग, डॉ. जोगिंदर सिंग, एटीडीएस (गाझियाबाद) चे अध्यक्ष डॉ. अनंत कुमार तसेच भारतीय प्राणी सर्वेक्षण, कोलकाता येथील शास्त्रज्ञ डॉ. देवांशु गुप्ता यांच्या हस्ते रणजित राऊत यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या परिषदेत थायलंड, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि भारतातील शास्त्रज्ञ, संशोधक, प्राध्यापक व पर्यावरण तज्ज्ञ सहभागी झाले होते. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण, शाश्वत विकास, मानव-वन्यजीव संघर्ष अभ्यास आणि त्यावरील उपाययोजना तसेच समाजाभिमुख संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन रणजित राऊत यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

परिषदेदरम्यान त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनासंदर्भातील संशोधनपर शोधनिबंध सादर केला. त्यांच्या प्रभावी संशोधन मांडणीला परीक्षकांनी सर्वोच्च मानांकन देत मौखिक सादरीकरणाचे प्रथम पारितोषिक जाहीर केले. त्यामुळे त्यांच्या संशोधन कार्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष गौरव झाला.

या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, विभागप्रमुख व संशोधक उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. टी. एस. पठाण, डॉ. पी. आर. मोरे, डॉ. अशोक मुंडे, डॉ. संतोष रणखांब, डॉ. रामहरी मायकर, डॉ. विकास कल्याणकर, डॉ. अतुल चौरपगार, डॉ. सुनिल खाडे, डॉ. यास्मिन शेख, डॉ. संगीता डोंगरे, डॉ. प्रियंका गायकवाड, डॉ. आयेशा दुर्रानी, प्राचार्य डॉ. कोलफुके आणि डॉ. कानवटे यांचा समावेश होता.

सन्मान स्वीकारल्यानंतर रणजित राऊत यांनी हा पुरस्कार आपल्या गुरुजन, संशोधन मार्गदर्शक, सहकारी आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सर्व घटकांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि संशोधन क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, या दुहेरी यशामुळे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अंबाजोगाईसह संपूर्ण मराठवाड्याच्या संशोधन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Previous Post

धुळे विभागाकडून शहादा आगाराची कायमची उपेक्षा? प्रवाशांचा संतप्त सवाल; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

Next Post

कोयना नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
कोयना नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

कोयना नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In