• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा मृत्यू
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

बीड | प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांनी भरलेली बोट गोदावरी नदीत उलटल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत सिंदखेडराजा तालुक्यातील बिबी येथील रहिवासी सौ. प्रमिला शेषराव राठोड (वय ५५ वर्षे) आणि सौ. कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६० वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातात अन्य काही भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले.

या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. जखमी भाविकांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Previous Post

कोयना नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

कडक उन्हामुळे विदर्भातील शाळांना मुदतवाढ; आता २२ जूनपासून होणार शाळा सुरू

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
148
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
22
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
30
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
7
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
79
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
17
Next Post

कडक उन्हामुळे विदर्भातील शाळांना मुदतवाढ; आता २२ जूनपासून होणार शाळा सुरू

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In