• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोयना नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोयना नदीत बुडून १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

पाटण | प्रतिनिधी

पाटण तालुक्यातील निसरे येथील कोयना नदीच्या पात्रात आंघोळ करत असताना १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १० जून रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ दिपक चव्हाण (वय १२) हा आपल्या वडिलांसोबत निसरे येथील कोयना नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी गेला होता. निसरे बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूस असलेल्या पाणवठ्याजवळ तो नदीत आंघोळ करत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला.

ही बाब लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्या काही मुलांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याला नदीकिनारी आणण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचविता आला नाही. आपल्या डोळ्यांसमोर मुलगा बुडाल्याचे पाहून वडिलांना मोठा धक्का बसला असून घटनास्थळी त्यांनी हंबरडा फोडला.

समर्थ हा आरेवाडी येथील वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. अल्पवयात त्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे नदी, तलाव व बंधाऱ्यांमध्ये आंघोळ करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags: Vaibhav Chavan
Previous Post

बँकॉकच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांचा दुहेरी सन्मान

Next Post

पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा मृत्यू

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा मृत्यू

पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In