• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कडक उन्हामुळे विदर्भातील शाळांना मुदतवाढ; आता २२ जूनपासून होणार शाळा सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

माढेळी | प्रतिनिधी

राज्यातील शाळा दरवर्षीप्रमाणे १५ जूनपासून सुरू होणार असताना विदर्भातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत विदर्भातील शाळा २२ जून २०२६ पासून सुरू करण्याचा आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

यापूर्वी शिक्षण विभागाने २८ मार्च २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार विदर्भातील शाळाही उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, विदर्भातील वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य शासनाला कडक शब्दांत विचारणा करत, “विदर्भातील एवढ्या तीव्र उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवणार? त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल उपस्थित केला होता. न्यायालयाने शासनाला याबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते.

न्यायालयाच्या भूमिकेनंतर तसेच शिक्षक संघटनांच्या वाढत्या मागण्यांचा विचार करून शासनाने निर्णयात बदल करत विदर्भातील शाळा १५ जूनऐवजी २२ जूनपासून सुरू करण्याचे निश्चित केले आहे.

याचिकाकर्त्यांनी २००७ आणि २०२३ मधील शासन निर्णयांचा आधार घेत विदर्भाच्या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीनुसार शाळा उशिरा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने २२ जून ही तारीख निश्चित केली आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कडक उन्हात शाळेसाठी करावी लागणारी पायपीट टळणार असून उष्माघाताचा धोका कमी होणार आहे. त्यामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी वर्गातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

Previous Post

पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा मृत्यू

Next Post

पवईत हरिपाठातून घुमला भक्तिरंगाचा नाद; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
पवईत हरिपाठातून घुमला भक्तिरंगाचा नाद; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

पवईत हरिपाठातून घुमला भक्तिरंगाचा नाद; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In