• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पवईत हरिपाठातून घुमला भक्तिरंगाचा नाद; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
पवईत हरिपाठातून घुमला भक्तिरंगाचा नाद; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईतील पवई येथे असलेल्या श्री दुर्वाप्रिय गजानन मंदिरात पुरुषोत्तम मासाच्या पवित्र पर्वानिमित्त मंगळवार, दि. ९ जून २०२६ रोजी एकदिवसीय हरिपाठाचे आयोजन करण्यात आले होते. या भक्तिमय कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या हरिपाठासाठी मुंबईतील नामांकित श्री संत मोरे माऊली स्वर साधना हरिपाठ मंडळ, घाटकोपर यांना निमंत्रित करण्यात आले होते. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंकुश महाराज कुमठेकर (कोकणरत्न) यांच्या नेतृत्वाखाली हरिपाठ संपन्न झाला.

हरिपाठाला गायनाची साथ बाळकृष्ण महाराज अहिरे, महेश कळंबे, लक्ष्मण दाभेकर, युवराज साळुंखे आणि अमित जाधव यांनी केली. तर पखवाजाची साथ बालकलाकार सुजल संजय गोगावले, वैष्णव माऊली कळंबे आणि विघ्नेश लक्ष्मण वाडकर यांनी दिली.

या हरिपाठामध्ये लहान मुली, महिला तसेच स्थानिक महिला मंडळाच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. भक्तिरसाने भरलेल्या वातावरणात उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संत जनाबाई यांच्या परंपरेची आठवण करून देणारा जात्यावर बसून ओव्या गाण्याचा उपक्रम. महिलांनी पारंपरिक पद्धतीने ओव्या सादर करत सांस्कृतिक वारशाचे जतन केले. हा उपक्रम नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरला.

या कार्यक्रमाला मुंबईतील सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मंदिराचे अध्यक्ष विलास मार्कल, उपाध्यक्ष राजेंद्र देसाई, खजिनदार उत्तम चव्हाण तसेच सचिन साळुंखे, बाळा राणे, धर्माजी वीरकर आणि मंगेश शिंदे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी श्रींच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Previous Post

कडक उन्हामुळे विदर्भातील शाळांना मुदतवाढ; आता २२ जूनपासून होणार शाळा सुरू

Next Post

जलजीवन मिशन योजनेत अनियमिततेचा आरोप; वाळणे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
जलजीवन मिशन योजनेत अनियमिततेचा आरोप; वाळणे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

जलजीवन मिशन योजनेत अनियमिततेचा आरोप; वाळणे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In