• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदाराचे उपोषण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदाराचे उपोषण
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

पैठण | प्रतिनिधी

आयुष्यभर कष्ट करून जमा केलेली रक्कम परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या एका ठेवीदाराने थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. पैठण शहरातील नाका रोड परिसरातील गोदावरी मल्टीस्टेट सोसायटीच्या शाखेसमोर ठेवीदार गोविंद शेळके यांनी चक्री उपोषण सुरू केले आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

रवींद्रनगर येथील रहिवासी असलेले गोविंद शेळके यांनी मालवाहतूक वाहन चालवून मिळालेल्या उत्पन्नातून एक-एक पैसा साठवत सुमारे १० लाख रुपयांची ठेव संबंधित संस्थेत गुंतवली होती. अधिक व्याजदराच्या आशेने त्यांनी ही रक्कम पतसंस्थेत ठेवली होती. मात्र मुदत पूर्ण होऊनही त्यांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत मिळालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ठेवीची रक्कम परत मिळावी आणि संबंधित प्रकरणात प्रशासनाने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, या मागणीसाठी शेळके यांनी संस्थेच्या शाखेसमोर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून इतर ठेवीदारांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, संबंधित संस्थेकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ठेवीदारांच्या मागण्यांकडे प्रशासन आणि संस्थेचे पदाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

जलजीवन मिशन योजनेत अनियमिततेचा आरोप; वाळणे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

Next Post

पाणीटंचाईवर उपाय म्हणून निर्गुणा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
129
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
19
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
24
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
5
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
71
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
16
Next Post
पाणीटंचाईवर उपाय म्हणून निर्गुणा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

पाणीटंचाईवर उपाय म्हणून निर्गुणा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In