• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जलजीवन मिशन योजनेत अनियमिततेचा आरोप; वाळणे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
जलजीवन मिशन योजनेत अनियमिततेचा आरोप; वाळणे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी
0
SHARES
500
VIEWS
Ad 1

महाबळेश्वर | प्रतिनिधी

महाबळेश्वर तालुक्यातील मौजे वाळणे ग्रामपंचायत हद्दीत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत अनागोंदी व अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वाळणे गावात सुमारे सात वाड्या-वस्त्या असून कायमस्वरूपी लोकसंख्या सुमारे ७०० आहे. मात्र एप्रिल व मे महिन्यात ही संख्या १५०० ते १८०० पर्यंत वाढते. गावासाठी तीन वर्षांपूर्वी जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे २८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असली तरी त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, योजनेअंतर्गत गावात अर्धा इंच व एक इंच व्यासाच्या पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत. मात्र साठवण टाकीतून पाणीपुरवठा करण्यासाठी आउटलेट पाइपचा वापर करण्यात येत असल्याने दूषित पाणी मिळत असल्याची तक्रार आहे. तसेच योजनेची संपूर्ण माहिती ग्रामपंचायतीकडेही उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दलित वस्तीत १५व्या वित्त आयोगातून ४५ हजार रुपयांच्या पाइपलाइन कामाची नोंद असली तरी प्रत्यक्षात ते काम जलजीवन मिशनमधून करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात झाली असून त्यात केवळ दोन घरे व एका वस्तीसाठी दोन इंच व्यासाची पाइपलाइन टाकण्यात येत असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. संपूर्ण गावात लहान व्यासाच्या पाइपलाइन असताना दोन घरांसाठी मोठ्या व्यासाची पाइपलाइन देण्यामागील कारण स्पष्ट करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तसेच ही पाइपलाइन काही ठिकाणी सांडपाणी वाहणाऱ्या गटारातून टाकण्यात येत असल्याने भविष्यात गटारे साफसफाई करताना पाइपलाइनचे नुकसान होण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

ग्रामस्थांनी जलजीवन मिशनच्या दोन्ही टप्प्यांतील कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्त्यालगतच्या गटारांवर टाकण्यात आलेले अनधिकृत भराव हटवून गटारे मोकळी करण्यात यावीत, जेणेकरून पावसाळ्यात शेतीचे नुकसान होणार नाही, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती तपासावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

पवईत हरिपाठातून घुमला भक्तिरंगाचा नाद; भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदाराचे उपोषण

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
0
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
9
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
8
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
17
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
3
Next Post
पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदाराचे उपोषण

पतसंस्थेत अडकलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदाराचे उपोषण

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In