• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; १२.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

कोपरगाव | प्रतिनिधी

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने कोपरगाव तालुक्यातील रवंदे परिसरात अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई करत वाळूने भरलेला डंपर आणि दुचाकीसह सुमारे १२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

१० जून रोजी सकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी प्रमोद जाधव यांच्या फिर्यादीवरून विक्रम बाजीराव आहेर (वय ३७) व पंढरी मसू आहेर (वय ४६, दोघेही रा. मुखेड, ता. येवला, जि. नाशिक) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या कारवाईमुळे तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जनता दरबारात अनेक नागरिकांनी घरकुल योजना व इतर बांधकामांसाठी वाळू उपलब्ध होत नसल्याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. शासनाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना अधिकृत मार्गाने वाळू मिळत नसल्याने अनेक कामे रखडल्याचेही नागरिकांनी मांडले होते.

मात्र दुसरीकडे राजरोसपणे अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याचे एलसीबीच्या कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिक आणि घरकुल लाभार्थी वाळूसाठी हेलपाटे मारत असताना दुसरीकडे वाळू माफिया बिनधास्तपणे नदीपात्रातून वाळू उपसा करून वाहतूक कशी करतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरही या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous Post

पाणीटंचाईवर उपाय म्हणून निर्गुणा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

Next Post

दोंडाईचात ५६ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड; ‘प्रविण आय क्लिनिक’चा ३१ वा वर्धापनदिन उत्साहात

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
124
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
17
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
23
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
5
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
70
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
16
Next Post
दोंडाईचात ५६ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड; ‘प्रविण आय क्लिनिक’चा ३१ वा वर्धापनदिन उत्साहात

दोंडाईचात ५६ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड; ‘प्रविण आय क्लिनिक’चा ३१ वा वर्धापनदिन उत्साहात

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In