• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोंडाईचात ५६ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड; ‘प्रविण आय क्लिनिक’चा ३१ वा वर्धापनदिन उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
दोंडाईचात ५६ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड; ‘प्रविण आय क्लिनिक’चा ३१ वा वर्धापनदिन उत्साहात
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

दोंडाईचा | प्रतिनिधी

जागतिक दृष्टीदान दिन तसेच ‘प्रविण आय क्लिनिक’च्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त दोंडाईचा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स, शंकरा आय हॉस्पिटल (आनंद) आणि प्रविण आय क्लिनिक (दोंडाईचा) यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी मार्ग येथील प्रविण आय क्लिनिकमध्ये हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

शिबिरात एकूण ११३ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५६ गरजू रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून पुढील उपचारासाठी त्यांना आनंद (गुजरात) येथील शंकरा आय हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.

उद्घाटनप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांनी प्रविण आय क्लिनिकच्या गेल्या तीन दशकांतील कार्याचा गौरव करत सांगितले की, हजारो रुग्णांवर मोफत व यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया करून संस्थेने समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. दोंडाईचासह धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील रुग्णांचा या सेवेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या वतीने तसेच दोंडाईचा शहरातील नागरिकांतर्फे नेत्र तंत्रज्ञ प्रविण महाजन यांना ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. बांधकाम सभापती मुकेश देवरे यांनीही संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

शिबिरात आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी, औषधोपचार तसेच राहण्याची व जेवणाची व्यवस्था पूर्णपणे मोफत करण्यात आली होती. नेत्र तंत्रज्ञ प्रविण महाजन यांनी स्वतः रुग्णांची सखोल तपासणी करून मार्गदर्शन केले.

या प्रसंगी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, बांधकाम सभापती मुकेश देवरे, नगरसेवक हितेंद्र महाले, कृष्णा नगराळे, जितू गिरासे, चतुर पाटील, नरेंद्र कोळी, महेंद्र बाबा कोळी, प्रशांत कागणे, हेमंत जाधव, मुकुंद चौधरी, प्रा. राम वाघमारे, रोटरी सिनियर्सचे कार्यकारी सचिव रविंद्र पाटील, प्रशांत ठोंबरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी शंकरा आय हॉस्पिटलचे समन्वयक सत्यानंद, चालक इक्बालभाई तसेच प्रविण आय क्लिनिकचे व्यवस्थापक भगवान माळी, प्रल्हाद पाटील, अंकुश माळी, दिप्तेश वारुळे आणि इकबाल शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; १२.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

आंबेगावच्या चार युवक-युवतींची PSI पदावर नियुक्ती; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
121
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
17
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
23
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
5
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
70
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
16
Next Post
आंबेगावच्या चार युवक-युवतींची PSI पदावर नियुक्ती; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

आंबेगावच्या चार युवक-युवतींची PSI पदावर नियुक्ती; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In