• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरोळ बंधाऱ्यावरून सव्वादोन लाखांच्या ४५ बर्ग्यांची चोरी; पाटबंधारे विभाग सतर्क

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
शिरोळ बंधाऱ्यावरून सव्वादोन लाखांच्या ४५ बर्ग्यांची चोरी; पाटबंधारे विभाग सतर्क
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून अंदाजे २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ४५ बर्ग्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पाटबंधारे विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच संबंधित प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

मिळालेल्या माहितीनुसार, ७ जूनच्या रात्री परिसरात जोरदार वळवाचा पाऊस झाला होता. याच दरम्यान कुरुंदवाड-शिरोळ मार्गावरील पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यावरून ३० लोखंडी आणि १५ लाकडी असे एकूण ४५ बर्गे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

चोरीस गेलेल्या लोखंडी बर्ग्यांचे वजन प्रत्येकी सुमारे २० ते २१ किलोपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि वजनदार साहित्याची चोरी करण्यासाठी संघटित टोळी तसेच वाहनाचा वापर करण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे यापूर्वीही या बंधाऱ्यावरून बर्ग्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

स्थानिकांच्या मते, बंधाऱ्यावर सुरक्षेसाठी चौकीदाराची व्यवस्था असली तरी तो केवळ दिवसा कार्यरत असतो. रात्रीच्या वेळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने चोरट्यांना संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. घटनेच्या रात्री झालेला मुसळधार पाऊस आणि निर्मनुष्य परिसर यामुळे चोरी सुलभ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेनंतर बंधाऱ्यावर रात्रपाळीसाठी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पाटबंधारे विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या तपासानंतर चोरीमागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

कळंबोलीत सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याविरोधात नागरिकांचा संताप; महावितरण कार्यालयावर धडक

Next Post

हजरत दौलत शहावली बाबा दर्ग्याचा उरूस भक्तीमय वातावरणात संपन्न

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
30
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
हजरत दौलत शहावली बाबा दर्ग्याचा उरूस भक्तीमय वातावरणात संपन्न

हजरत दौलत शहावली बाबा दर्ग्याचा उरूस भक्तीमय वातावरणात संपन्न

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In