• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हजरत दौलत शहावली बाबा दर्ग्याचा उरूस भक्तीमय वातावरणात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
हजरत दौलत शहावली बाबा दर्ग्याचा उरूस भक्तीमय वातावरणात संपन्न
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे हजरत दौलत शहावली बाबा दर्ग्याचा वार्षिक उरूस गुरुवारी मोठ्या भक्तीभाव आणि उत्साहात संपन्न झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या उरूसाला परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

उरूसानिमित्त दर्गा परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दर्गा व मजार परिसराला रंगरंगोटी करण्यात आली असून हिरव्या पताका, विद्युत रोषणाई आणि ध्वनीव्यवस्थेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने नटला होता.

हजरत दौलत शहावली बाबा दर्गा हे कुरुंदवाड आणि परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असून येथे हिंदू आणि मुस्लिम समाजातील भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. सामाजिक सलोखा आणि धार्मिक सौहार्द जपणारे हे ठिकाण म्हणून दर्ग्याची ओळख आहे.

उरूसाच्या पूर्वसंध्येला १० जून रोजी संदल कार्यक्रम पार पडला. कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रावसाहेब उर्फ दा. आ. पाटील यांच्या निवासस्थानातून मानाचा संदल वाजतगाजत दर्ग्याकडे नेण्यात आला. गालिफा चढविण्याचा मान कुरुंदवाड पोलीस ठाण्याला देण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस निरीक्षक जीवन पाटील आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी गालिफा मिरवणुकीत सहभाग घेतला.

या दर्ग्याचे वैशिष्ट्य म्हणजे उरूसादरम्यान मांसाहार पूर्णपणे वर्ज्य ठेवला जातो. भाविकांना शुद्ध शाकाहारी मलिदा-भात आणि साखरेचा नैवेद्य प्रसाद म्हणून वितरित केला जातो.

उरूसानिमित्त मार्केट कमिटीतील हर्षद बागवान, शब्बीर बागवान आणि बागवान व्यापारी बांधवांच्या वतीने हिंदू-मुस्लिम भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री कव्वालीच्या सवाल-जवाबाचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम रंगला.

दर्गा परिसरात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रख्यात गायक उस्ताद रहिमत खाँ यांची मजारही असून त्यामुळे या स्थळाला धार्मिकतेबरोबरच ऐतिहासिक आणि सांगीतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कुरुंदवाड हे पटवर्धन संस्थानाच्या काळापासून संगीत परंपरेसाठी प्रसिद्ध राहिले आहे.

दर गुरुवारी येथे हिंदू-मुस्लिम भाविक साखर व उद अर्पण करून प्रदक्षिणा घालतात आणि दर्शन घेतात. धार्मिक सलोखा आणि परस्पर श्रद्धेचे दर्शन घडविणारा हा उरूस परिसरातील ऐक्याचा संदेश देणारा ठरला.

उरूस यशस्वी करण्यासाठी हजरत दौलत शहावली बाबा दर्गा ट्रस्टचे चेअरमन युनूस अब्दुल मुल्ला, विश्वस्त हाजी गौस लाजम मुल्ला, बापुसो मुल्ला, तन्वीर मुल्ला, मीरासो मुल्ला, मस्जिद मुल्ला, सद्दाम मुल्ला, मुस्तफा मुल्ला, शब्बीर बाबालाल मुल्ला आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

शिरोळ बंधाऱ्यावरून सव्वादोन लाखांच्या ४५ बर्ग्यांची चोरी; पाटबंधारे विभाग सतर्क

Next Post

साने गुरुजींच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
साने गुरुजींच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

साने गुरुजींच्या ७६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In