• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

७२ वर्षीय गंगाबाई बारसे ठरल्या स्वावलंबनाचा आदर्श; दुग्ध व्यवसायातून देत आहेत प्रेरणेचा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
७२ वर्षीय गंगाबाई बारसे ठरल्या स्वावलंबनाचा आदर्श; दुग्ध व्यवसायातून देत आहेत प्रेरणेचा संदेश
0
SHARES
159
VIEWS
Ad 1

अहेरी | प्रतिनिधी

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी-चान्ना येथील ७२ वर्षीय सौ. गंगाबाई बारसे या आजही आपल्या कष्टाळू वृत्तीमुळे परिसरात स्वावलंबनाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. गावात त्यांच्याकडे प्रेमाने आणि आदराने “अम्मा” म्हणून पाहिले जाते.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षित करून समाजात सक्षम व जागरूक नागरिक म्हणून घडविले आहे. कष्ट, स्वाभिमान आणि प्रामाणिकपणाचा वारसा मुलांमध्ये रुजविण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले आहे.

वयाच्या ७२ व्या वर्षीही अम्मा स्वतः गाईंचे दूध काढून दुग्ध व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मुलांकडून वारंवार विश्रांती घेण्याचा आग्रह केला जातो, मात्र त्या हसत म्हणतात, “रिकामा क्षण आयुष्यात निराशेचे धन असतो; कामात मन रमले की आनंदाचे क्षण मिळतात.”

स्वावलंबनाचा संदेश देताना त्या नेहमी सांगतात की, “माणसाने आपल्या गरजांपुरते काम केले पाहिजे. श्रमामुळे शरीर निरोगी राहते आणि आत्मसन्मान टिकून राहतो.” त्यांच्या मते बेरोजगारी ही केवळ परिस्थिती नसून मनाची अवस्था आहे. कोणतेही काम लहान नसते आणि श्रमाची लाज बाळगू नये, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

गावातील सरपंच डॉ. सचिन डोंगरे, कोतवाल शरद रामटेके, ठेकेदार हेमू फुंडे, महाजन गोपाल बहेकार आणि व्यापारी गणेश ब्राम्हणकर यांनी अनेकदा त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र गंगाबाई बारसे उलट त्यांनाच स्वावलंबी राहण्याचा आणि सतत कार्यरत राहण्याचा संदेश देतात.

“आईची घडण देही, बाळाला वळण” या उक्तीप्रमाणे मुलांच्या संगोपनात संस्कारांचे महत्त्व त्या नेहमी अधोरेखित करतात. त्यांच्या मते, चांगले नागरिक घडविण्याची पहिली जबाबदारी आईचीच असते.

कष्ट, स्वाभिमान, स्वावलंबन आणि संस्कार यांचा अनोखा संगम असलेल्या गंगाबाई बारसे या आजच्या तरुण पिढीसह बेरोजगारांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या जीवनप्रवासातून श्रमप्रतिष्ठा आणि आत्मनिर्भरतेचा मौल्यवान संदेश समाजाला मिळत आहे.

Previous Post

ब्राईट फ्युचर स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची ISRO व IIT शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी राज्यस्तरावर निवड

Next Post

नांदगाव येथे १० वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाची घटना; सखोल तपासाची मागणी

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
2
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
2
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
3
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
2
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
नांदगाव येथे १० वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाची घटना; सखोल तपासाची मागणी

नांदगाव येथे १० वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाची घटना; सखोल तपासाची मागणी

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In