• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ब्राईट फ्युचर स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची ISRO व IIT शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी राज्यस्तरावर निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
ब्राईट फ्युचर स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची ISRO व IIT शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी राज्यस्तरावर निवड
0
SHARES
67
VIEWS
Ad 1

मळद | प्रतिनिधी | दि. 10 जून 2026

खडकी (ता. दौंड) येथील ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय ‘उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा’मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेच्या तीन विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) येथे आयोजित शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

या स्पर्धेत इयत्ता सहावी, नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी सहा विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड झाली. अंतिम राज्य गुणवत्ता यादीत इयत्ता नववीतील काळे रिद्धी सचिन हिने राज्यात 12वा क्रमांक, तर इयत्ता सहावीतील खोमणे धीरज गणेश याने 7वा आणि शितोळे साईराज मनोज याने 8वा क्रमांक पटकावत विशेष यश मिळवले.

या यशाच्या बळावर तिन्ही विद्यार्थ्यांना ISRO आणि IIT येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि अंतराळ विज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक घडामोडींची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षक तेजस गायकवाड आणि प्रशांत चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजू गायकवाड, संचालिका रोहिणी गायकवाड, खजिनदार तुषार काळे, सचिव ऋषिकेश गायकवाड, उपाध्यक्ष तेजस गायकवाड, मुख्याध्यापिका शीतल काळभोर, उपमुख्याध्यापक योगेश हगारे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

दिघोळ माळेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग; 11 जागांसाठी चुरशीची लढत निश्चित

Next Post

७२ वर्षीय गंगाबाई बारसे ठरल्या स्वावलंबनाचा आदर्श; दुग्ध व्यवसायातून देत आहेत प्रेरणेचा संदेश

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
2
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
2
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
3
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
2
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
७२ वर्षीय गंगाबाई बारसे ठरल्या स्वावलंबनाचा आदर्श; दुग्ध व्यवसायातून देत आहेत प्रेरणेचा संदेश

७२ वर्षीय गंगाबाई बारसे ठरल्या स्वावलंबनाचा आदर्श; दुग्ध व्यवसायातून देत आहेत प्रेरणेचा संदेश

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In