• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नांदगाव येथे १० वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाची घटना; सखोल तपासाची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
नांदगाव येथे १० वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाची घटना; सखोल तपासाची मागणी
0
SHARES
551
VIEWS
Ad 1
Ad 1

नांदगाव (ता. मंगरूळनाथ, जि. वाशिम) | प्रतिनिधी :

नांदगाव येथे १० वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी रवी साखरे (वय १०) हिने सांगितले की, मोबाईल चार्जर मागण्याच्या बहाण्याने आलेल्या काही अनोळखी व्यक्तींनी तिला काळ्या रंगाच्या कारमध्ये बसविले. त्यानंतर तिला धानोरा मार्गे वाशिमपर्यंत नेण्यात आले. मात्र, प्रसंगावधान राखत तिने स्वतःची सुटका करून घेतल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांनी या प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संशयित वाहनाचा शोध घेणे तसेच घटनेमागील सत्य परिस्थिती उघड करण्यासाठी सखोल तपास करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गाव व परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करणे, नियमित पोलीस गस्त वाढविणे आणि बालसुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची अधिकृत चौकशी पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Ad 1
Tags: Dhananjay Gawande
Previous Post

७२ वर्षीय गंगाबाई बारसे ठरल्या स्वावलंबनाचा आदर्श; दुग्ध व्यवसायातून देत आहेत प्रेरणेचा संदेश

Next Post

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करण्याची मागणी

Related Posts

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
Blog

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026
6
घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल
Blog

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

November 1, 2026
15
माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत
Blog

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

October 31, 2026
29
शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट
Blog

शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट

October 31, 2026
14
पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!
Blog

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

October 30, 2026
13
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव
Blog

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

October 29, 2026
4
Next Post

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करण्याची मागणी

ताज्या बातम्या

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

November 1, 2026
शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In