• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता विविध हवामान तज्ज्ञ, अभ्यासक आणि हवामानविषयक संस्थांकडून व्यक्त करण्यात येत असल्याने संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करून कृत्रिम पाऊस पाडण्याची योजना राबवावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे.

RelatedPosts

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

जून महिन्याचा मध्य जवळ आला असतानाही राज्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सन 2005 मध्ये बंद करण्यात आलेला ‘प्रकल्प वर्षा’ पुनरुज्जीवित करून क्लाऊड सीडिंग (Cloud Seeding) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडण्याचा पर्याय शासनाने गांभीर्याने विचारात घ्यावा, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

कृत्रिम पाऊस म्हणजे वातावरणातील उपलब्ध पावसाळी ढगांमध्ये विशिष्ट रसायनांची फवारणी करून पाऊस पडण्यास पोषक परिस्थिती निर्माण करण्याची वैज्ञानिक प्रक्रिया होय. भारतातील काही राज्यांनी याचा यशस्वी वापर केला असून विशेषतः आंध्र प्रदेशमध्ये हायग्रोस्कोपिक क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाद्वारे सकारात्मक परिणाम मिळाल्याचे उदाहरण देण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, कृत्रिम पाऊस प्रकल्पासाठी काही कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असला तरी दुष्काळी परिस्थितीत शासनाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या, रोजगार हमी योजनांची कामे, जलटंचाई निवारण उपाययोजना आणि इतर प्रशासकीय बाबींवर शेकडो कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कृत्रिम पाऊस प्रकल्प अधिक परिणामकारक आणि किफायतशीर ठरू शकतो.

याशिवाय पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याची समस्या, रोजगार हमी योजनांवरील ताण तसेच दुष्काळी परिस्थितीत उद्भवणाऱ्या विविध अडचणी कमी करण्यासाठीही हा प्रकल्प उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने तातडीने ‘प्रकल्प वर्षा’ पुनरुज्जीवित करून आवश्यक रडार प्रणाली, विमाने, हवामान निरीक्षण यंत्रणा आणि क्लाऊड सीडिंगसाठी लागणारी संपूर्ण सुविधा उभारून कृत्रिम पावसाचा कार्यक्रम राबवावा, अशी मागणी भारतीय जनसंसदचे राज्य निमंत्रक अशोक सब्बन, सरपंच कैलास पठारे, युवानेते अशोक ढगे, वीर बहादूर प्रजापती, सुनील टाक, परदेशी, भगवान जगताप, भोसले, पोपटराव साठे आणि जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Previous Post

नांदगाव येथे १० वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाची घटना; सखोल तपासाची मागणी

Next Post

वाळुंजनगरच्या कु. आकांक्षा वाळुंज यांचे एमबीबीएस पदवीत घवघवीत यश; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

Related Posts

Blog

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
9
Blog

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026
2
Blog

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026
1
Blog

कावलगाव येथील अंगणवाडीची इमारत धोकादायक; साप आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण

July 24, 2026
2
Blog

आयुक्त निर्धारित वेळेत नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप; पिंपरी-चिंचवडमध्ये ३० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा

July 24, 2026
1
भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू
Blog

भडगाव परिसरात मादी बिबटाचा मृतदेह आढळला; मृत्यूचे कारण अस्पष्ट, वन विभागाचा तपास सुरू

July 24, 2026
16
Next Post
वाळुंजनगरच्या कु. आकांक्षा वाळुंज यांचे एमबीबीएस पदवीत घवघवीत यश; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

वाळुंजनगरच्या कु. आकांक्षा वाळुंज यांचे एमबीबीएस पदवीत घवघवीत यश; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

ताज्या बातम्या

उसनापुर–वापगाव मुख्य रस्त्याची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

July 24, 2026

तांभा गावात तीन दिवसांपासून अंधार; स्ट्रीट लाईट बंद, ग्रामस्थांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 24, 2026

पिशोर येथील देशी दारू दुकानाबाहेर तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलीस तपास सुरू

July 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In