• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तिलारी घाटातील महिला हत्याकांडाचा छडा; कोल्हापूर एलसीबीकडून ३ आरोपींना अटक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

आजरा | प्रतिनिधी

चंदगड तालुक्यातील तिलारी घाट परिसरात अज्ञात महिलेचा मृतदेह फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अत्यंत गुंतागुंतीच्या हत्येचा छडा लावण्यात कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) यश आले आहे. या प्रकरणी कर्नाटक राज्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, तपास पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल निलोत्पल यांनी ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

जंगलात सापडला होता अज्ञात महिलेचा मृतदेह

दि. २९ मे २०२६ रोजी सकाळी चंदगड तालुक्यातील तिलारी घाट परिसरात, कोदाळी-दोडामार्ग मार्गावरील जंगलात मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला चंदगड पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

शवविच्छेदनातून हत्येचा उलगडा

वैद्यकीय तपासणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अज्ञात व्यक्तींनी स्टीलच्या शॉक अब्झॉर्बर पाईपसारख्या हत्याराने डोक्यावर वार करून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून मिळाला धागा

तपासादरम्यान पोलिसांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील तब्बल १९९ बेपत्ता महिलांची माहिती तपासली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले.

तपासात २५ मे रोजी एक संशयास्पद क्रूझर वाहन तिलारी घाटातून अवघ्या २० मिनिटांत परतल्याचे आढळून आले. पुढील तपासात मृत महिला एका मोटारसायकलवरून संशयितासोबत जाताना आणि नंतर क्रूझर वाहनाजवळ पोहोचल्याचे दिसून आले. यानंतर संशयाची सुई बसवराज करणावर याच्याकडे वळली.

शिनोळी परिसरात सापळा रचून अटक

गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने शिनोळी परिसरात सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक आरोपी

  • यल्लाप्पा महिलाप्पा करणावर (वय ५७, राजकुदट्री, बेळगाव)
  • बसवराज यल्लाप्पा करणावर (वय ३३, राजकुदट्री, बेळगाव)
  • लगमाप्पा अंकलगी (वय ३७, कैचनहट्टी, बेळगाव)

आरोपींनी मृत महिलेची ओळख गंगव्वा सत्याप्पा हंचीमणी (वय २५, वंटमुरी, बेळगाव) अशी असल्याचे सांगितले असून तिला तिलारी घाटात आणून खून केल्याची कबुली दिली आहे.

या गुन्ह्याचा तपास सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. तसेच अण्णासाहेब जाधव, रामदास इंगवले, निंगाप्पा चौखंडे यांच्यासह एलसीबी आणि चंदगड पोलिसांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

अटक आरोपींना पुढील तपासासाठी चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

चिंचोली लिंबाजी ग्रामपंचायत निवडणूक 2026 : वार्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर

Next Post

आडगाव भोसलेच्या सैनिक परंपरेत भर; दोन युवकांची भारतीय सैन्यात निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
191
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

आडगाव भोसलेच्या सैनिक परंपरेत भर; दोन युवकांची भारतीय सैन्यात निवड

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In