• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनमान्य शाळांनाच प्राधान्य द्या : गट शिक्षणाधिकारी एम. बी. राठोड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

प्रवेशापूर्वी शाळेची शासनमान्यता व यू-डायस क्रमांक तपासण्याचे पालकांना आवाहन

पाथरी | प्रतिनिधी

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेताना विशेष काळजी घ्यावी आणि केवळ शासनमान्यता प्राप्त तसेच अधिकृत यू-डायस (UDISE) क्रमांक असलेल्या शाळांमध्येच प्रवेश द्यावा, असे आवाहन पाथरी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी एम. बी. राठोड यांनी केले आहे.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देताना राठोड यांनी सांगितले की, काही संस्था आवश्यक परवानग्या व शासनमान्यता न घेता शाळा अथवा वर्ग सुरू करत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. अशा अनधिकृत शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

पुढील शिक्षण, शिष्यवृत्ती, शैक्षणिक नोंदी, प्रमाणपत्रे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने पालकांनी कोणत्याही प्रकारच्या आकर्षक जाहिराती किंवा भुलथापांना बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाथरी तालुक्यातील शासनमान्य शाळा आणि शासनाची मंजुरी प्राप्त संस्थांची अधिकृत यादी पंचायत समिती पाथरी येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध करण्यात आली आहे. पालकांनी प्रवेश निश्चित करण्यापूर्वी संबंधित शाळेची शासनमान्यता, यू-डायस क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश प्रक्रियेदरम्यान सर्व बाबींची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे. तसेच ज्या संस्था शासनमान्य नाहीत, यू-डायस अथवा यूआयडी क्रमांक नसताना शिक्षण देत आहेत किंवा पालकांकडून अवाजवी शुल्क आकारत आहेत, अशा संस्थांविरोधात नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गट शिक्षणाधिकारी एम. बी. राठोड यांनी दिला आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाच्या या आवाहनामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशाबाबत घाई न करता संबंधित शाळेची अधिकृत माहिती तपासूनच निर्णय घ्यावा, असे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे.

“शासनमान्य शाळा, अधिकृत यू-डायस क्रमांक आणि आवश्यक परवानग्यांची खातरजमा करूनच प्रवेश घ्या; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करू नका,” असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

समाज आणि राष्ट्राप्रती कृतज्ञ भावनेतून स्वयंप्रेरणेने नियमित रक्तदान; प्राथमिक शिक्षक निलेश ठोके यांचा प्रेरणादायी उपक्रम

Next Post

माढेळी ग्रामस्थांना डिजिटल पेमेंटबाबत आरबीआय एनजीओमार्फत जनजागृती

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
104
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

माढेळी ग्रामस्थांना डिजिटल पेमेंटबाबत आरबीआय एनजीओमार्फत जनजागृती

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In