• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समाज आणि राष्ट्राप्रती कृतज्ञ भावनेतून स्वयंप्रेरणेने नियमित रक्तदान; प्राथमिक शिक्षक निलेश ठोके यांचा प्रेरणादायी उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in Blog
0
समाज आणि राष्ट्राप्रती कृतज्ञ भावनेतून स्वयंप्रेरणेने नियमित रक्तदान; प्राथमिक शिक्षक निलेश ठोके यांचा प्रेरणादायी उपक्रम
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

धुळे | प्रतिनिधी

रक्तदानाविषयी जनजागृती होणे ही काळाची गरज असून, समाजाप्रती दायित्वाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रभावी माध्यम म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. याच भावनेतून धुळे जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक निलेश ठोके यांनी नियमित रक्तदानाचा संकल्प जपत समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नुकतेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, सायन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात देशभरातील शेकडो रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यामध्ये शिक्षक निलेश ठोके यांनीही स्वयंप्रेरणेने सहभागी होत आपला वार्षिक रक्तदानाचा संकल्प पूर्ण केला.

विशेष म्हणजे, राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणारे निलेश ठोके हे नांदेड येथे रक्तदान करणारे राज्यातील एकमेव प्राथमिक शिक्षक ठरले आहेत. शिक्षण सेवेत रुजू होण्यापूर्वीपासूनच ते रक्तदान, अवयवदान आणि सामाजिक जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत.

रक्तदान केल्याबद्दल त्यांचा डॉ. पल्लवी आणि डॉ. रीथ जॉन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. समाजात रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, अधिकाधिक लोकांनी रक्तदान करावे आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

निलेश ठोके यांनी शिक्षणासोबतच क्रीडा, योग, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उपक्रमांमध्येही उल्लेखनीय योगदान दिले आहे. यावर्षी धुळे जिल्हा परिषद आयोजित कला-क्रीडा उत्सवात आरोग्य जनजागृती करणाऱ्या योगनृत्य सादरीकरणासाठी त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यासाठी त्यांचा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तसेच जलयुक्त शिवार अभियान, पर्यावरण संवर्धन आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. सीएसएमटी येथे 26/11 दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांनी प्राण गमावलेल्या ठिकाणी जाऊन रक्तदान करण्याची त्यांची कृती ही त्या हल्ल्यातील हुतात्म्यांना वाहिलेली एक अनोखी श्रद्धांजली मानली जात आहे.

“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” हा संदेश समाजात रुजविण्यासाठी निलेश ठोके सातत्याने प्रयत्न करत असून त्यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या आणि विविध सामाजिक समस्यांशी झुंजणाऱ्या तरुण पिढीसमोर सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद मानला जात आहे.

शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या मूल्यवर्धन प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक परवेज खाटीक आणि तालुका समन्वयक राजेंद्र पगारे यांनीही निलेश ठोके यांच्या रक्तदान विषयक कार्याचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे समाजात रक्तदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचत असून अधिकाधिक लोक रक्तदानासाठी पुढे येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

५५२ पदांसाठी ४ लाखांहून अधिक उमेदवारांची स्पर्धा; पदवाढीची मागणी जोर धरतेय

Next Post

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनमान्य शाळांनाच प्राधान्य द्या : गट शिक्षणाधिकारी एम. बी. राठोड

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनमान्य शाळांनाच प्राधान्य द्या : गट शिक्षणाधिकारी एम. बी. राठोड

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In