• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in Blog
0
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहन
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

अंबरनाथ | प्रतिनिधी

यंदाच्या शैक्षणिक वर्षात विविध शालेय व महाविद्यालयीन परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघटना अंबरनाथ शहर कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, वह्या व शैक्षणिक साहित्य किट देऊन गौरविण्यात आले.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

या कार्यक्रमास संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळू शिंदे, सचिव अरुण संकटे, श्रीधर लिंगम, वेंकटेश गट्टेगला, अंबरनाथ शहराध्यक्ष बंडू नागवंशी, लक्ष्मी कोली, वसई शहराध्यक्ष वैभव मेस्त्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना बाळू शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाचा उल्लेख केला. शिक्षणाच्या बळावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहून देशाला नवी दिशा दिली. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,” या विचाराचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन समाज व देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले.

तसेच, भारतीय राज्यघटनेमुळे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले असून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवाधिकारांचे मूल्य समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शेवटी श्रीधर लिंगम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

१ ऑगस्टपासून एसटीतील सवलतींसाठी NCMC कार्ड बंधनकारक

Next Post

ह.भ.प. शांताराम महाराज साळुंखे यांना ‘वारकरी भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
160
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
29
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
39
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
10
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
92
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post

ह.भ.प. शांताराम महाराज साळुंखे यांना ‘वारकरी भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In