• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

१ ऑगस्टपासून एसटीतील सवलतींसाठी NCMC कार्ड बंधनकारक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in Blog
0
१ ऑगस्टपासून एसटीतील सवलतींसाठी NCMC कार्ड बंधनकारक
0
SHARES
48
VIEWS
Ad 1

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून भाडे सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) बंधनकारक करण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी हा नियम लागू होणार असून, पुढील काळात इतर सवलतधारक प्रवाशांनाही या व्यवस्थेत समाविष्ट करण्यात येणार आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली. सवलत योजनांमध्ये पारदर्शकता आणणे, पात्र लाभार्थ्यांपर्यंतच लाभ पोहोचवणे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे होणारा गैरवापर रोखणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या एसटी महामंडळाकडून विद्यार्थी, दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक तसेच विविध पुरस्कार विजेत्यांसह सुमारे ३५ प्रवर्गांतील प्रवाशांना भाड्यात सवलत दिली जाते. मात्र, काही ठिकाणी बनावट ओळखपत्रांच्या आधारे सवलतीचा लाभ घेतल्याच्या तक्रारी समोर आल्याने डिजिटल पडताळणीची आवश्यकता निर्माण झाली होती.

महामंडळाच्या माहितीनुसार, राज्यभरात आतापर्यंत ५१ लाखांहून अधिक प्रवाशांनी NCMC कार्डासाठी नोंदणी केली असून, त्यापैकी सुमारे २५ लाख कार्डे सक्रिय करण्यात आली आहेत. या मोहिमेसाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत.

प्रवाशांना बस स्थानकांवर १९९ रुपये शुल्क भरून NCMC कार्ड मिळणार असून, कार्डच्या नूतनीकरणासाठी १४९ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच कार्डमध्ये किमान १०० रुपयांची शिल्लक ठेवणे आवश्यक राहणार आहे.

एसटी महामंडळाने पात्र प्रवाशांना वेळेत नोंदणी करून आपले कार्ड सक्रिय करण्याचे आवाहन केले आहे. १ ऑगस्टनंतर सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड आवश्यक राहणार असल्याने संबंधित प्रवाशांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Previous Post

नागवेच्या मातीतून घडले दोन डॉक्टर; सख्या भाऊ-बहिणीची एमबीबीएसमध्ये प्रथम श्रेणीत यशस्वी भरारी

Next Post

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहन

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In