आज ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी
आज ज्ञानेश्वर विद्यालय बेगमपुरा येथे कै.पंढरीनाथ पाटील उर्फ भाऊ ढाकेफळकर सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी व ‘जय जवान जय किसान’ चा नारा देणारे भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीम.मोरे मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती पाथ्रीकर मॅडम व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री भडके सर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीम.डॉ.राठोड यांनी केले.श्री.देगलूरकर यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी श्री.कापडणे,श्री.तांगडे श्री.बढे श्री.झोडपे श्री.औटे,श्री.जाधव,श्री.साठे,श्री.भारती श्री.चव्हाण,श्री गोर्डे श्री.मोरे श्री.शिंदे श्रीम.महाजन,श्रीम.मुडपे श्रीम.बिरोटे,श्रीम.कदम,श्रीम.डांगे,श्रीम.बोरगावकर यांची उपस्थिती होती.
Discussion about this post