आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा तालुक्यातील वडेगाव निपाण्या या गावात भेट घेतली असता गावातील माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य संजय कोरेटी यांनी गावातील समस्यांविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले.
महत्त्वाची बाब म्हणजे खुद्द माजी सरपंच यांच्या घरासमोरील आश्रम शाळेकडे जाणारा सिमेंट रस्ता पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आले परंतु अजूनही त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही.जागोजागी खड्डे तयार झाले आहेत त्यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आंजणटोला येथे पाण्याची टाकी तयार करण्यात आली असून त्यात मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. अशा परिस्थितीत ऐन पावसाळ्यात सुद्धा पाणी टंचाईचा सामना समस्त गावकऱ्यांना सहन करावा लागतो. यातून सुटका कोण करेल? यासारखे अनेक विकासात्मक मूलभूत प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाले असून अजूनही ते प्रश्न अनुत्तरीत आहेत.
तेव्हा खेमराज भाऊ नेवारे यांनी गावातील संपूर्ण समस्या जाणून घेऊन ग्रामविकास अधिकारी, पंचायत समिती, कुरखेडा यांच्याशी निवेदनाद्वारे पत्रव्यवहार करणे व या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असा निर्धार केला.
याप्रसंगी खेमराज भाऊ नेवारे यांच्यासोबत वैभव परशुरामकर, जितेश कापगते, नरेश वासनिक व अन्य गावकरी उपस्थित होते.आरमोरी विधानसभा क्षेत्राचे विकासात्मक विचार सरणी असणारे युवा नेते.. खेमराज भाऊ नेवारेदेसाईगंज. 9325969029
Discussion about this post