• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदिवासी कोळी समाजाचा भव्य मेळावा लवकरच; रावेर येथे महत्त्वपूर्ण निर्णय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

रावेर | प्रतिनिधी :

आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्था, रावेर यांच्या वतीने संपूर्ण समाजाची भव्य सभा व समाज मेळावा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय संस्थेच्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत घेण्यात आला.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

दि. १४ जून २०२६ रोजी तांदलवाडी येथे आयोजित करण्यात आलेली ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्न, संस्थेचा प्रसार-प्रचार, समाज विकासासाठीची भावी दिशा तसेच आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. समाजातील एकोपा अधिक दृढ करण्यासाठी तसेच युवक, महिला आणि विद्यार्थ्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भव्य समाज मेळावा आयोजित करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

या मेळाव्यात समाजासमोरील विविध समस्या, युवक व महिलांचे सक्षमीकरण, शैक्षणिक प्रगती, रोजगाराच्या संधी, सामाजिक ऐक्य, शासकीय योजनांचा लाभ तसेच समाजहिताच्या विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीस संस्थेचे अध्यक्ष Manohar Pandit Koli, उपाध्यक्ष Vinod Ramchandra Koli, सचिव Yogeshwar Vishwanath Koli, सहसचिव Subhash Sukdev Sapkale, खजिनदार Vicky Krishna Koli, कार्याध्यक्ष Bhushan Prakash Tayde, प्रसिद्धी प्रमुख Shubham Sunil Koli यांच्यासह सल्लागार, संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच अशोक रामदास कोळी, किरण सोपान कोळी, गोपाळ सुधाकर कोळी, विनोद रामदास कोळी, संतोष वामन सपकाळे, हरीलाल रमेश कोळी, संदीप तुकाराम महाले, विजय देविदास कोळी, सुपडू दोधू मोरे, समाधान सदाशिव कोळी, ईश्वर शालीग्राम कोळी, विनोद मिठाराम कोळी, जयराम चिंतामण कोळी, शरद सुपडू कोळी, उमेश मोहन कोळी आणि ज्ञानेश्वर पुंडलिक खवले यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.

बैठकीचे नियोजन व आयोजन सचिव योगेश्वर विश्वनाथ कोळी यांनी केले. बैठकीनंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य समाज मेळाव्यात जास्तीत जास्त समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आदिवासी कोळी बहुउद्देशीय शिखर संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: Nikhil Padme
Previous Post

आंबेळे बुद्रुकच्या आदित्य दळवी यांचे एमबीबीएस परीक्षेत घवघवीत यश

Next Post

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांना वाढदिवसानिमित्त विशेष अभिष्टचिंतन

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
151
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
59
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांना वाढदिवसानिमित्त विशेष अभिष्टचिंतन

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In