• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नरसिंहवाडीत मोठी दुर्घटना; सहकाऱ्याला वाचवताना इचलकरंजीच्या तरुणाचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
59
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

नृसिंहवाडी येथे अमावास्येनिमित्त श्री दत्त दर्शनासाठी आलेल्या इचलकरंजी येथील एका तरुणाचा कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज पहाटे घडली. बुडणाऱ्या आपल्या सहकाऱ्याला वाचविण्यासाठी नदीत उडी घेतलेल्या या तरुणाला स्वतःचे प्राण गमवावे लागले. राम कुशलराम (रा. कापड मार्केट, इचलकरंजी, मूळ गाव राजस्थान) असे मृत तरुणाचे नाव आहे.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मिळालेल्या माहितीनुसार, अमावास्येनिमित्त नृसिंहवाडीत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. इचलकरंजी येथून आलेले राम कुशलराम हे आज पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीवर स्नानासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा एक सहकारी नदीच्या पाण्यात अडचणीत सापडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याला मदत करण्यासाठी राम यांनी तात्काळ नदीत उडी घेतली.

राम यांनी आपल्या सहकाऱ्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र, नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते स्वतः खोल पाण्यात अडकले आणि बुडाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनात कार्यरत वजीर रेस्क्यू फोर्सच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सकाळी ६ वाजल्यापासून नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली. सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी ८.३० वाजता राम कुशलराम यांचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू पथकाला यश आले.

मृतदेह नदीबाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे नृसिंहवाडी परिसरात तसेच इचलकरंजी येथे हळहळ व्यक्त केली जात असून, सहकाऱ्याचे प्राण वाचवताना स्वतःचा जीव गमावलेल्या राम कुशलराम यांच्या धाडसाला सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

लोक जनशक्ती पार्टीची राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न; संघटनात्मक बांधणीवर भर

Next Post

औरवाड येथे कृष्णा नदी पात्रात आढळला अज्ञात मृतदेह; ‘वजीर रेस्क्यू फोर्स’कडून मृतदेह बाहेर काढण्यात यश

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
38
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
22
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
96
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
204
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
68
Next Post

औरवाड येथे कृष्णा नदी पात्रात आढळला अज्ञात मृतदेह; ‘वजीर रेस्क्यू फोर्स’कडून मृतदेह बाहेर काढण्यात यश

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In