• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोहरम सण धार्मिक परंपरा, शांतता व शिस्तीत साजरा करा : शकील गरगरे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

मोहरम हा श्रद्धा, त्याग आणि धार्मिक एकतेचा संदेश देणारा हिंदू-मुस्लिम बांधवांचा सण असून, भाविकांनी शांतता, शिस्त आणि कायद्याच्या चौकटीत राहून मोहरम सण साजरा करावा, असे आवाहन पीर-पंजा कमिटीचे अध्यक्ष शकील गुलाब गरगरे यांनी केले.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

कुरुंदवाड येथील बैरागदार मशिदीत सोमवारी सायंकाळी मोहरम सणाच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहरम उत्सवाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली.

यावेळी बोलताना शकील गरगरे यांनी शहरातील सर्व मशिदी, धार्मिक संस्था आणि पीर कमिट्यांनी परस्पर समन्वय ठेवून सण साजरा करावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

मोहरम काळात भाविकांची वाढती उपस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक मशिद कमिटीने पिण्याचे पाणी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

मोहरम कार्यक्रमाचे नियोजन :

  • १६ जून – कुदळविधी
  • १७ जूनपासून – पहिली ते दहावी धार्मिक परंपरा
  • २१ जून – पाचवी व पीर प्रतिष्ठापना
  • २३ जून – सातवी, पीरांच्या पहिल्या भेटी
  • २४ जून – आठवी, पीरांच्या दुसऱ्या दिवसाच्या भेटी
  • २५ जून – नववी खतल रात्र
  • २६ जून – दहावी व पीर/ताबूत विसर्जन
  • २८ जून – चिरमुरे जारत/जारता कार्यक्रमाने उत्सवाची सांगता

यावेळी नागेश घाटगे, अजित पाटील, जहांगीर जमादार, करीम मकानदार, बापूसाहेब असंगे यांनी मनोगते व्यक्त केली.

बैठकीस मज्जिद गोदड, हरिबा शेडबाळे, नासिर आंबी, दस्तगीर अपराध, फारुख जमादार, सादिक दबासे, चंद्रकांत घडसे, सचिन अडसूळ, शब्बीर मतापे, मेहबूब मोमीन, जंग मोमीन, मुस्तफा मुल्ला यांच्यासह शहरातील विविध पीर-पंजा कमिटीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी कुरुंदवाडमध्ये आंदोलन तीव्र; पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट, धनाजी चूडमुंगे यांचे प्राणांतिक उपोषण सुरू

Next Post

महिलांच्या धाडसाने अवैध दारू विक्रेता रंगेहात पकडला; मारेगाव पोलिसांची तत्पर कारवाई

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

महिलांच्या धाडसाने अवैध दारू विक्रेता रंगेहात पकडला; मारेगाव पोलिसांची तत्पर कारवाई

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In