• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी कुरुंदवाडमध्ये आंदोलन तीव्र; पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट, धनाजी चूडमुंगे यांचे प्राणांतिक उपोषण सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

पंचगंगा नदीतील औद्योगिक प्रदूषणाच्या प्रश्नावरून कुरुंदवाडमध्ये सोमवारी आंदोलनाला तीव्र वळण लागले. आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. अधिकारी आणि आंदोलक यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संघटनेचे प्रमुख धनाजी चूडमुंगे यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

कुरुंदवाड नगरपरिषदेच्या समोरील चौकात सकाळपासून आंदोलनकर्ते एकत्र जमले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळ अथवा संबंधित विभागाचे अधिकारी चर्चेसाठी येतील, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली होती. मात्र जवळपास दोन तास प्रतीक्षा करूनही अधिकारी न आल्याने आंदोलकांनी इचलकरंजी कृष्णा पाणी योजनेच्या मजरेवाडी येथील केंद्राला टाळे ठोकण्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.

मोर्चा रवाना होण्यापूर्वीच पोलिसांनी प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये संताप उसळला. काही आंदोलक पोलीस व्हॅनसमोर आडवे झोपले, तर काहींनी दुचाकी आणि दगड रस्त्यावर टाकून मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजी, धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमकींमुळे पालिका चौक आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, शिवाजीराव गायकवाड, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष माने यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नंतर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड घटनास्थळी दाखल झाले.

यानंतर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तहसीलदार अनिलकुमार हेळकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अंकुश पाटील तसेच आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. संघटनेचे नेते अंकुश पाटील आणि धनाजी चूडमुंगे यांनी प्रक्रिया केलेले पाणी सोडण्यासाठी उपलब्ध शेतीचा तपशील जाहीर करावा, संबंधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करूनच पाणी सोडावे, शेती उपलब्ध नसल्यास प्रक्रिया केंद्र सुरू करू नये तसेच काळ्या ओढ्याकडे पाणी वळविण्यासाठी उभारलेला बांध तातडीने बंद करावा, अशा मागण्या मांडल्या.

मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आली नसल्याने बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर आंदोलकांनी पुन्हा पालिका चौकात ठिय्या आंदोलन सुरू करत प्राणांतिक उपोषणाची घोषणा केली.

पंचगंगा नदीत औद्योगिक प्रक्रिया केलेले रासायनिक सांडपाणी सोडून पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलन अंकुश संघटनेने केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इचलकरंजी महापालिकेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान, कुरुंदवाड शहराला आंदोलनामुळे अक्षरशः छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

अकोल्यात शिवसेनेला मोठे बळ; बार्शीटाकळीतील १० नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

Next Post

मोहरम सण धार्मिक परंपरा, शांतता व शिस्तीत साजरा करा : शकील गरगरे

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

मोहरम सण धार्मिक परंपरा, शांतता व शिस्तीत साजरा करा : शकील गरगरे

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In