• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुधनी जि.प. प्राथमिक मराठी केंद्र शाळेत शैक्षणिक प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
दुधनी जि.प. प्राथमिक मराठी केंद्र शाळेत शैक्षणिक प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न
0
SHARES
77
VIEWS
Ad 1

अक्कलकोट ता. | प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील दुधनी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ निमित्त इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांसाठी आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ट्रॅक्टरमधून गावात प्रभातफेरी काढण्यात आली. या अनोख्या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमाला पंचायत समिती अक्कलकोटच्या नूतन सदस्या श्रीमती संगीता शिवानंद पाटील आणि श्री शिवानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री हणमंत कलशेट्टी, उपाध्यक्ष श्री राजेंद्र इंगळे, शिक्षणतज्ज्ञ तथा रिपाइं सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, सदस्य श्री उमाकांत आळंद, श्री मिहिदीमिया जिडगे, श्री दाऊद नदाफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते नवागत विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा मंगल प्रारंभ करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचेही वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री पोमू राठोड यांनी केले. सूत्रसंचालन श्री रविकुमार कोरचगाव आणि श्री सुहास पवार यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संजीवकुमार बेण्णीसुर आणि श्रीमती शोभा म्हेत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी श्रीमती अंजली गुंजोटी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post

कणकवलीत ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’चे भूमिपूजन; १ कोटींच्या निधीतून साकार होणार उद्यान

Next Post

अनिश्चित पाऊस आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; अडावद परिसरात हळहळ

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
19
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

अनिश्चित पाऊस आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; अडावद परिसरात हळहळ

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In