• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कणकवलीत ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’चे भूमिपूजन; १ कोटींच्या निधीतून साकार होणार उद्यान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | कणकवली

कणकवली शहराच्या ग्रामीण भागातील बहुप्रतीक्षित ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ या उद्यानाच्या कामाचा शुभारंभ नुकताच उत्साहात पार पडला. नगरपंचायतीला मंजूर झालेल्या १ कोटी रुपयांच्या निधीतून हे उद्यान उभारले जाणार असून, उद्यानाचे भूमिपूजन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

या कार्यक्रमाला माजी आमदार राजन तेली, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक तसेच मुख्याधिकारी गौरी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कणकवलीच्या विकासासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही दिली. शहरातील १४ विकासकामांच्या वर्क ऑर्डर लवकरच काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आठवड्यातून एक दिवस ‘जनता दरबार’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

माजी आमदार राजन तेली यांनी ग्रामीण भागातील या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांच्या मागणीनुसार शहराची नवीन आरक्षणे डोंगराळ भागात नेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरासाठी सुसज्ज सुलभ शौचालय मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘नमो उद्यान’ उपक्रमांतर्गत या उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, हे उद्यान भविष्यात शहरासाठी रोल मॉडेल ठरेल.

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी स्वच्छ आणि सुंदर कणकवली घडवण्यासाठी ग्रामस्थांनी विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, लुकेश कांबळे, राकेश राणे, बाळू पारकर, नगरसेविका दीपिका जाधव, जाई मुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासह अनेक मान्यवर, नगरपंचायतीचे कर्मचारी, पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मळदच्या तलाठ्याचा मनमानी कारभार? मूळ शेतकऱ्याचे नाव परस्पर सातबाऱ्यावरून कमी केल्याचा आरोप

Next Post

दुधनी जि.प. प्राथमिक मराठी केंद्र शाळेत शैक्षणिक प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post
दुधनी जि.प. प्राथमिक मराठी केंद्र शाळेत शैक्षणिक प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

दुधनी जि.प. प्राथमिक मराठी केंद्र शाळेत शैक्षणिक प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In