• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अनिश्चित पाऊस आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; अडावद परिसरात हळहळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

अडावद : चोपडा तालुक्यातील अडावद येथे अनिश्चित पाऊस, शेतीतील अस्थिरता आणि वाढत्या आर्थिक संकटामुळे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गोविंदा चैत्राम गंभीर (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा गंभीर यांच्याकडे सुमारे पाच एकर कोरडवाहू शेती होती. मागील वर्षी मक्याच्या पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. यंदा चांगले उत्पादन मिळेल या आशेने त्यांनी कर्ज काढून शेतीची तयारी केली होती. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली.

घेतलेले कर्ज कसे फेडायचे, शेतीचे नुकसान कसे भरून काढायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेतून ते मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. अखेर १४ जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या गच्चीवरून उडी घेत आपले जीवन संपवले.

घटनेनंतर त्यांना तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. १५ जून रोजी शवविच्छेदनानंतर अडावद येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत शेतकऱ्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी, हवामानातील अनिश्चितता आणि कर्जबाजारीपणाच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Tags: Maheshprasad Dikshit
Previous Post

दुधनी जि.प. प्राथमिक मराठी केंद्र शाळेत शैक्षणिक प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

Next Post

डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; आरपीएफ जवानाची प्रकृती गंभीर

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
169
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
62
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; आरपीएफ जवानाची प्रकृती गंभीर

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In