• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रामनगर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी : वर्धा

वर्धा जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत रामनगर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या दारूबंदी पथकाने १५ जून २०२६ रोजी पहाटे जुनापाणी चौक पुलाजवळील सर्व्हिस रोडवर नाकाबंदी करून एका चारचाकी वाहनासह मोठ्या प्रमाणात विदेशी दारू व बिअरचा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण ६ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मयूर प्रकाश मांद्रीले (वय २५, रा. स्नेहल नगर, वर्धा) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामनगर पोलीस ठाण्याचे दारूबंदी पथक रात्री गस्त घालत असताना त्यांना एका चारचाकी वाहनातून अवैध दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुनापाणी चौक पुलाच्या सर्व्हिस रोडवर सापळा रचून नाकाबंदी केली.

पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान संशयित वाहन अडवून झडती घेतली असता, वाहनात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू व बिअरचा साठा आढळून आला.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :

  • ‘टॅंगो पंच’ देशी दारू ९० ML च्या २०० शिश्या – किंमत ₹२०,०००
  • ट्यूबर्ग बिअर ६५० ML च्या १२ बाटल्या – किंमत ₹५,४००
  • ट्यूबर्ग बिअर कॅन ५०० ML चे ७२ डबे – किंमत ₹२८,८००
  • बडवायझर बिअर ६५० ML च्या १२ बाटल्या – किंमत ₹५,४००
  • निळ्या रंगाची मारुती सुझुकी कार (MH 40 KR 4360) – किंमत ₹६,००,०००

एकूण जप्त मुद्देमाल : ₹६,५९,६००

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे मॅडम व सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले यांच्या नेतृत्वाखाली दारूबंदी पथकातील अवि. बनसोड, मनोज भोमले, मुकेश वांदिले आणि विकी अणेराव यांनी ही धडक कारवाई पार पाडली

Previous Post

यशवंत विद्यालय हिंगणी येथे रोटरी क्लब होरायझन नागपूरतर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणाचा शुभारंभ

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
20
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
23
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In