• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यशवंत विद्यालय हिंगणी येथे रोटरी क्लब होरायझन नागपूरतर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

सेलू प्रतिनिधी :

हिंगणी येथील यशवंत विद्यालयात दि. १४ जून २०२६ रोजी रोटरी क्लब होरायझन नागपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि शाळेत ये-जा करणे सुलभ व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. नंदकिशोर ठाकरे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुंगळकर, सचिव डॉ. मृणाली बल्लाळ, क्लब सदस्य डॉ. बल्लाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज बावणे तसेच हिंगणी सर्कल प्रमुख मनोज वाघमारे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दाआजी उपाख्य बापुरावजी देशमुख आणि माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुंगळकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी होणारा त्रास कमी व्हावा आणि त्यांचा वेळ वाचावा, या हेतूने दरवर्षी सायकल वाटपाचा उपक्रम राबविला जातो.

रोटरी क्लबच्या सचिव सौ. शिल्पा धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना सायकलींचा योग्य वापर करून चांगले शिक्षण घेण्याचे आवाहन केले. “या सायकली किमान पाच वर्षे व्यवस्थित वापरा आणि शिक्षणाच्या जोरावर शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करा,” असे त्या म्हणाल्या.

मुख्याध्यापक श्री. ठाकरे सर यांनी आपल्या मनोगतात रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, “ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना २० सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचून त्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ देता येईल,” असे सांगितले. तसेच शाळेच्या वतीने रोटरी क्लब होरायझन नागपूरचे आभार मानले.

या कार्यक्रमाला इयत्ता ५ वी ते १० वीचे लाभार्थी विद्यार्थी, पालक, गावातील मान्यवर तसेच शाळेचे ग्रंथपाल श्री. अशोक काळे, लिपिक श्री. बोनी देवढे, श्री. सतीश तेलरांधे आणि देवेंद्र वैद्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नरेंद्र ढवळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक श्री. अनिल लोहकरे सर यांनी केले.

Tags: Shankar Panbude
Previous Post

राजगड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पीआय संतोष जाधव यांचा अवैध धंद्यांवर कडक कारवाईचा इशारा

Next Post

रामनगर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
169
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
62
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

रामनगर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In