• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणाचा शुभारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

जिल्हा आणि राज्याच्या विकासाला चालना देणारी महत्त्वपूर्ण मोहीम

प्रतिनिधी : वर्धा

विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला गती देण्यासाठी राज्यात प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे सर्वेक्षण राबविण्यात येत असून, वर्धा जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दोन्ही सर्वेक्षणांच्या माहिती पत्रकांचे प्रकाशनही करण्यात आले.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

कार्यक्रमाला वर्धा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, हिंगणघाटच्या नगराध्यक्ष डॉ. नयना तुळकसकर, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त मुरलीनाथ वाडेकर, सहाय्यक नियोजन अधिकारी राधाकृष्ण चव्हाण तसेच मुख्याधिकारी विजय देशमुख उपस्थित होते.

श्रमशक्ती सर्वेक्षणाद्वारे विविध क्षेत्रांतील रोजगार स्थितीचा अचूक आढावा घेतला जाणार आहे. या माध्यमातून कौशल्य विकास कार्यक्रमांना दिशा मिळण्यासोबतच रोजगार निर्मितीच्या प्रभावी योजना आखणे, आर्थिक व सामाजिक विकासाचे नियोजन करणे आणि श्रम बल सहभाग दर, कामगार लोकसंख्या गुणोत्तर तसेच बेरोजगारी दर यांसारख्या महत्त्वाच्या निर्देशांकांची मोजणी करणे शक्य होणार आहे.

यासोबतच असंघटित बिगर कृषी उद्योगांचे सर्वेक्षण देखील करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून लहान उत्पादक, व्यापारी, सेवा प्रदाते, वाहतूक, शिक्षण, आरोग्य यांसारख्या क्षेत्रांतील आर्थिक आणि कार्यात्मक माहिती संकलित केली जाणार आहे. उद्योगांचे स्वरूप, आकार, कार्यपद्धती, संसाधने, उत्पादन, सेवा वितरण, खर्च आणि उत्पन्न यांचा सविस्तर अभ्यास या माध्यमातून होणार आहे.

या सर्वेक्षणामुळे जिल्ह्यातील असंघटित क्षेत्राची अचूक माहिती उपलब्ध होऊन भविष्यातील योजना आणि धोरणात्मक नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

हे सर्वेक्षण मार्च २०२७ पर्यंत सुरू राहणार असून, जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्य शासनाच्या नियोजन विभागामार्फत महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत ते राबविण्यात येत आहे.

सर्वेक्षणासाठी निवडलेल्या कुटुंबांकडून माहिती संकलित करण्यात येणार असून, ती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी या मोहिमेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.

Previous Post

रामनगर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत

Next Post

देवळी मतदारसंघातील समस्यांची सोडवणूक करून जनतेला न्याय देणार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
20
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
23
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

देवळी मतदारसंघातील समस्यांची सोडवणूक करून जनतेला न्याय देणार - पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In