• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संविधान मंदिराच्या स्थापनेने देशभक्ती वाढेल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

आमदार किसनराव वानखेडे यांचे प्रतिपादन

श्रीक्षेत्र माहूर : अधिक मास (पुरुषोत्तम मास) निमित्त माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या धोंडे जेवण महाप्रसाद उपक्रमाची सांगता सोमवार, १५ जून रोजी उत्साहात करण्यात आली. यावेळी मठाधीश राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांच्या संकल्पनेतून आश्रम परिसरात संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली. या संविधान मंदिराचे उद्घाटन आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार किसनराव वानखेडे यांनी संविधान मंदिराच्या स्थापनेमुळे नागरिकांमध्ये देशभक्ती, संविधानाविषयी आदर आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होईल, असे प्रतिपादन केले. तसेच या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

RelatedPosts

जि.प. शाळा बोरसूत येथे प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

आढीव जिल्हा परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

चांभुर्डीत ‘थेट तलावातून पाणीपुरवठ्या’च्या नावाखाली दूषित पाणी; नागरिकांमध्ये संताप, वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

गेल्या महिनाभरात विविध गावांतील दत्तभक्तांनी साहित्य व धान्य घेऊन आश्रमात येत महाप्रसाद सेवेत सहभाग नोंदविला. दररोज विविध प्रकारचे पदार्थ तयार करून हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे लाखो भाविकांनी कौतुक केले.

उपस्थित मान्यवरांनी साईनाथ महाराजांनी सुरू केलेल्या सप्तसूत्री उपक्रमाचे तसेच संविधान मंदिर स्थापनेच्या संकल्पनेचे स्वागत करत हा उपक्रम समाजात राष्ट्रीय मूल्ये रुजविणारा असल्याचे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे, देवगिरी प्रांत सहकार्यवाह रमेश जाधव, देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ. दिवाकर कुलकर्णी, प्रांत कार्यालय सहव्यवस्थाप्रमुख विशाल दरगड, विभाग संघचालक बबनराव जगाडे, नांदेड विभाग संघचालक संतोष तिरमनवार, विभाग सेवा प्रमुख आदित्य धाराशिवकर, कुंडलिक सावकार, जवाहरलाल जयस्वाल, सतीश कान्नाव, भाऊ पाटील हडसनीकर, सिताराम ठाकरे पाटील, पुंडलिक हुंबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महिनाभर महाप्रसाद सेवेत सहभागी झालेल्या सर्व भाविकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबनराव जगाडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रल्हाद देवडे (परभणीकर) यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीनिवास ताटेवार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

पहिले पाऊल ठसा उमटवत इयत्ता पहिलीच्या २१ विद्यार्थ्यांचे सारोळा शाळेत जल्लोषात स्वागत…!

Related Posts

Blog

जि.प. शाळा बोरसूत येथे प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
2
Blog

आढीव जिल्हा परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 16, 2026
0
Blog

चांभुर्डीत ‘थेट तलावातून पाणीपुरवठ्या’च्या नावाखाली दूषित पाणी; नागरिकांमध्ये संताप, वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

June 16, 2026
4
Blog

शिक्षक संघटना श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी बापूसाहेब गायकवाड तर सचिवपदी पंढरीनाथ सुपेकर यांची निवड

June 16, 2026
11
Blog

मान्सूनच्या विलंबाने बळीराजा चिंतेत; पेरण्या खोळंबल्याने शेतकरी संकटात!

June 16, 2026
26
Blog

ढोल-ताशांच्या गजरात लोणीतील विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत; शाळेच्या पहिल्या दिवशी आनंदोत्सव

June 16, 2026
11
Next Post

पहिले पाऊल ठसा उमटवत इयत्ता पहिलीच्या २१ विद्यार्थ्यांचे सारोळा शाळेत जल्लोषात स्वागत...!

ताज्या बातम्या

जि.प. शाळा बोरसूत येथे प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026

आढीव जिल्हा परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

June 16, 2026

चांभुर्डीत ‘थेट तलावातून पाणीपुरवठ्या’च्या नावाखाली दूषित पाणी; नागरिकांमध्ये संताप, वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

June 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In