• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परतूरमधील शाळेच्या स्नेहसंमेलनावरून वाद; कठोर कारवाईची आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

परतूर | प्रतिनिधी

परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित स्नेहसंमेलनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या व्हिडिओच्या आधारे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी संबंधित शाळेची मान्यता तात्काळ रद्द करून संस्था अध्यक्ष, शिक्षक आणि कार्यक्रम आयोजकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

आमदार लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांकडून कथितरित्या “गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा” या वादग्रस्त घोषणेशी संबंधित गाण्यावर नृत्य सादर करण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या हातात तलवारी देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.

यासोबतच कार्यक्रमादरम्यान काही वादग्रस्त छायाचित्रांचे प्रदर्शन करण्यात आल्याचेही व्हिडिओत दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे लोणीकर यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाचा संदर्भ देताना त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या घोषणांबाबत केलेल्या निरीक्षणांचाही उल्लेख केला. अशा घोषणा समाजात तेढ निर्माण करू शकतात आणि हिंसक प्रवृत्तींना चालना देऊ शकतात, असे न्यायालयाने नमूद केल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार लोणीकर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासण्याच्या आणि दोषींवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले. संबंधितांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गतही कारवाई करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, व्हायरल व्हिडिओची सत्यता, त्यातील दृश्ये आणि कार्यक्रमातील सादरीकरणाबाबत अधिकृत चौकशी अहवाल अद्याप समोर आलेला नसून प्रशासनाकडून तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Previous Post

पाणीटंचाईवरून नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर आक्रमक; “अन्यथा आम्ही स्वतः टँकर घेऊन जाऊ”

Next Post

शक्तिपीठ महामार्गाविरोधात २० जून रोजी कुंडल येथे शेतकरी एल्गार मेळावा

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
10
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
6
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
26
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
10
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
3
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
12
Next Post

शक्तिपीठ महामार्गाविरोधात २० जून रोजी कुंडल येथे शेतकरी एल्गार मेळावा

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In