• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शक्तिपीठ महामार्गाविरोधात २० जून रोजी कुंडल येथे शेतकरी एल्गार मेळावा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

पलूस | प्रतिनिधी

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी आणि बाधित शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कुंडल (ता. पलूस) येथे सर्वपक्षीय शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बलवडी-विटा रोडवरील मगदूम मल्टीपर्पज हॉलमध्ये, क्रांती साखर कारखान्याजवळ पार पडणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दीपक लाड यांनी दिली.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे पलूस, कडेगाव, खानापूर, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील हजारो एकर सुपीक शेती बाधित होण्याची शक्यता असून अनेक शेतकरी भूमिहीन होण्याच्या भीतीत आहेत. त्यामुळे या महामार्गाला परिसरातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष समितीने यापूर्वी घोगाव येथे एल्गार मेळावा, नेवरी ते घोगाव आत्मक्लेश पदयात्रा, विटा येथील आक्रोश मेळावा तसेच ड्रोन सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन अशा विविध माध्यमांतून आंदोलन उभारले आहे.

२० जून रोजीच्या मेळाव्यात शक्तिपीठ महामार्गाचे संभाव्य परिणाम, पुढील आंदोलनाची दिशा, कायदेशीर लढ्याचे नियोजन आणि विविध शेतकरी संघटनांमधील समन्वय यावर चर्चा होणार आहे. या मेळाव्यास राज्यातील शेतकरी संघटनांचे नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले.

घोगाव, कुंडल, कुंभारगाव, देवराष्ट्रे, शिरगाव, शेळकबाव, वडिये रायबाग, आंबेगाव, नेवरी, भाग्यनगर, माहुली, नागेवाडी, चिखलहोळ, भेंडवडे, विटा आदी गावांमधून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

बाहेरगावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वाहन पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दीपक लाड यांनी केले आहे.

Previous Post

परतूरमधील शाळेच्या स्नेहसंमेलनावरून वाद; कठोर कारवाईची आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

Next Post

नेवरी येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी लढ्याची रणनीती; संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
5
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
12
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
8
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
7
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
18
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
20
Next Post

नेवरी येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी लढ्याची रणनीती; संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In