• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंचगंगा नदी प्रदूषण आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर प्राणांतिक उपोषण मागे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर सुरू असलेले प्राणांतिक उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. तसेच पंचगंगा नदीकाठावरील गावांमध्ये बुधवारी जाहीर करण्यात आलेले चक्काजाम आंदोलनही स्थगित करण्यात आल्याची माहिती आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चूडमुंगे यांनी दिली.

RelatedPosts

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

पंचगंगा प्रदूषणमुक्ती सर्वपक्षीय व सर्व संघटना कृती समिती आणि आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने सोमवारी मजरेवाडी येथील इचलकरंजीच्या कृष्णा पाणी योजना केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा देत आंदोलन करण्यात आले होते. कुरुंदवाड येथील नगरपरिषद चौकात आंदोलनकर्ते जमले असताना पोलिसांनी हस्तक्षेप करत काही आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापटही झाली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांना नंतर सोडून दिले.

यानंतर आंदोलनकर्ते, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, तहसीलदार आणि पोलिस प्रशासन यांच्यात बैठक झाली. मात्र, “काळा ओढा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पक्का बांध घालावा” तसेच “प्रक्रिया केलेले रासायनिक सांडपाणी सोडण्यासाठी पर्यायी जमीन उपलब्ध होईपर्यंत संबंधित प्रोसेस पूर्णपणे बंद ठेवाव्यात” या प्रमुख मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्याने आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चूडमुंगे यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले होते.

मंगळवारपासून पंचगंगा नदीकाठावरील विविध गावांतील शेतकरी व नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी नदीकाठावरील सर्व गावांमध्ये चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी इचलकरंजीचे प्रांताधिकारी दीपक शिंदे, शिरोळचे तहसीलदार अनिल हेळकर आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी २२ आणि २३ जून रोजी इचलकरंजी येथे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, प्रोसेस मालक, आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्या उपस्थितीत संबंधित प्रोसेसधारकांकडून रासायनिक पाणी सोडण्यात येणाऱ्या शेती क्षेत्राची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल, असे सांगितले. तसेच २५ जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व संबंधितांची बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

या लेखी आश्वासनानंतर आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चूडमुंगे यांनी प्राणांतिक उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. तसेच बुधवारी होणारे चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“जिल्हाधिकाऱ्यांसमोर होणाऱ्या बैठकीत योग्य तोडगा न निघाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही धनाजी चूडमुंगे यांनी यावेळी दिला.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या फोटोवर दुग्धाभिषेक

Next Post

कुरुंदवाड व परिसरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

Related Posts

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
0
केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप
ताज्या घडामोडी

केस मागे घेण्यासाठी दबाव; खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा पत्रकार कांबळे यांचा आरोप

September 24, 2026
7
समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन
ताज्या घडामोडी

समता मार्च परिषदेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

September 24, 2026
7
ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
41
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
1
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
27
Next Post

कुरुंदवाड व परिसरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In