• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोपगाव येथे ‘खेत बचाओ अभियान’ व ‘एल निनो’ संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
बोपगाव येथे ‘खेत बचाओ अभियान’ व ‘एल निनो’ संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती
0
SHARES
98
VIEWS
Ad 1

पुरंदर | प्रतिनिधी :

“स्वस्थ मिट्टी, सशक्त किसान, समृद्ध भारत” या संकल्पनेवर आधारित ‘खेत बचाओ अभियान’ तसेच ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर मौजे बोपगाव (ता. पुरंदर) येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आणि शेती प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण व मंडळ कृषी अधिकारी (सासवड) रवींद्र खेसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी विजय जाधव यांनी केले होते.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाची पूर्वतयारी, हवामान बदलाचे परिणाम, पाणी व्यवस्थापन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद (द्राक्ष संशोधन केंद्र) येथील डॉ. एस. डी. रामटेके, डॉ. मदनकर मॅडम आणि श्री. कांबळे (टी.ओ.) यांनी बदलत्या हवामान परिस्थितीत शेती व्यवस्थापन कसे करावे यावर मार्गदर्शन केले.

तर अखिल भारतीय कोरडवाहू फळपीक संशोधन केंद्र, जाधववाडी येथील डॉ. प्रदीप दळवे आणि डॉ. युवराज बालगुडे यांनी सीताफळ बहार व्यवस्थापन, ‘एल निनो’ची पार्श्वभूमी, त्याचे शेतीवरील संभाव्य परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबाबत माहिती दिली.

कृषी विभागाच्या वतीने सासवडचे उप कृषी अधिकारी गणेश जगताप आणि दिवे गावचे सहाय्यक कृषी अधिकारी कोंडीबा जरांडे यांनी खरीप पिकांची निवड, पाण्याचा योग्य वापर आणि खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.

पाणी फाउंडेशनचे मेंटॉर व उप कृषी अधिकारी कदम साहेब तसेच सहाय्यक कृषी अधिकारी अतुल हिंगणे यांनी पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत शाश्वत शेतीसाठी जलसंधारणाची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष शेतावर विविध प्रात्यक्षिकेही घेण्यात आली. हुमणी अळी नियंत्रणासाठी ‘प्रकाश सापळा’ (Light Trap) वापरण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच BBF (रुंद वरंबा सरी) आणि गादी वाफ्यावर टोकन यंत्राद्वारे बियाणे पेरणी करण्याची आधुनिक पद्धत शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, ग्रामपंचायत बोपगाव, राजलक्ष्मी व राजनंदिनी महिला बचत गट, कालभैरवनाथ आदेश पुरुष बचत गट तसेच परिसरातील शेतकरी बांधव व भगिनी यांच्या सहकार्याने करण्यात आले.

Previous Post

वाळकी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

Next Post

कन्नडमध्ये पोलीस स्टेशनसमोर गँगवार; एकाची हत्या, शहरात खळबळ

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
0
Next Post

कन्नडमध्ये पोलीस स्टेशनसमोर गँगवार; एकाची हत्या, शहरात खळबळ

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In