• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘सारथी महाराष्ट्राचा न्यूज’च्या पाठपुराव्यानंतर तेरणा महाविद्यालय परिसरातील फुटपाथ झाला मोकळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येताच प्रशासनाची तातडीने दखल; नागरिकांकडून समाधान व्यक्त

नेरूळ, दि. १७ : सारथी महाराष्ट्राचा न्यूज च्या पाठपुराव्यानंतर तेरणा महाविद्यालय परिसरातील फुटपाथवरील अडथळे हटविण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी मार्ग पुन्हा सुरक्षित करण्यात आला आहे.

RelatedPosts

पुणे-कोल्हापूर महामार्गावर रात्री सीएनजी पंप बंद; वाहनधारक त्रस्त

साटेली भेडशी रस्त्यालगतच्या कालव्याला मोठे भगदाड; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका

परतूरमधील शालेय कार्यक्रमावरून वाद; चौकशीची मागणी

तेरणा महाविद्यालयाच्या शेजारील फुटपाथवर झाडांच्या तोडलेल्या फांद्या तसेच इतर कचऱ्याचा ढिगारा टाकण्यात आल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरून ये-जा करावी लागत होती. हा गंभीर प्रश्न सारथी महाराष्ट्राचा न्यूज ने वृत्ताच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता.

शाळा सुरू झाल्यानंतर दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी अनेक लहान मुले याच फुटपाथवर रांगेत उभी राहत असल्याने संभाव्य अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत होती. फुटपाथ अडथळ्यांनी व्यापल्यामुळे विद्यार्थ्यांना वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती.

लोकहिताचा हा प्रश्न प्रकाशझोतात आल्यानंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेत झाडांच्या फांद्या व कचऱ्याचा ढिगारा हटवून फुटपाथ पादचाऱ्यांसाठी पुन्हा खुला केला. वेळीच झालेल्या या कारवाईमुळे विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या निमित्ताने लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या पत्रकारितेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, परिसरातील नागरिकांनी प्रशासनासह सारथी महाराष्ट्राचा न्यूज चे आभार मानले आहेत.

— प्रतिनिधी, सारथी महाराष्ट्राचा न्यूज

Previous Post

पुणे-कोल्हापूर महामार्गावर रात्री सीएनजी पंप बंद; वाहनधारक त्रस्त

Related Posts

Blog

पुणे-कोल्हापूर महामार्गावर रात्री सीएनजी पंप बंद; वाहनधारक त्रस्त

June 17, 2026
8
Blog

साटेली भेडशी रस्त्यालगतच्या कालव्याला मोठे भगदाड; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका

June 17, 2026
7
Blog

परतूरमधील शालेय कार्यक्रमावरून वाद; चौकशीची मागणी

June 17, 2026
5
Blog

पत्रकार राजकुमार इकडे यांना ‘महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार 2026’ जाहीर

June 17, 2026
5
Blog

माधव नगर परिसरात कचरा जाळण्यामुळे नागरिक त्रस्त; महापालिकेविरोधात संताप

June 17, 2026
4
Blog

माहूरमध्ये महाराणा प्रताप सिंह जयंती उत्साहात साजरी

June 17, 2026
11

ताज्या बातम्या

‘सारथी महाराष्ट्राचा न्यूज’च्या पाठपुराव्यानंतर तेरणा महाविद्यालय परिसरातील फुटपाथ झाला मोकळा

June 17, 2026

पुणे-कोल्हापूर महामार्गावर रात्री सीएनजी पंप बंद; वाहनधारक त्रस्त

June 17, 2026

साटेली भेडशी रस्त्यालगतच्या कालव्याला मोठे भगदाड; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका

June 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In