• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आडोळ धरणात केवळ सात टक्के जलसाठा; रिसोडवर भीषण पाणीटंचाईचे संकट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

रिसोड प्रतिनिधी

रिसोड शहराची तहान भागवणाऱ्या आडोळ धरण मध्ये सध्या केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सूनचा पाऊस अद्याप समाधानकारक न झाल्याने तसेच उन्हाळ्यातील वाढत्या पाण्याच्या मागणीमुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रिसोड नगरपरिषद प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्याचा जलसाठा लक्षात घेता पुढील १५ दिवसांपेक्षा अधिक काळ नियमित पाणीपुरवठा करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या शहरात सहाव्या दिवशी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पावसाळा आणखी लांबल्यास हा कालावधी आठ दिवसांपर्यंत वाढू शकतो, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, धरणात कमी पाणी असतानाही शहरातील काही भागांत नळांना तोटे नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. काही नागरिकांकडून रस्ते धुणे, वाहन स्वच्छ करणे यासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा विभागाने अशा गैरवापरावर कठोर निर्बंध घालावेत, अशी मागणी पुढे येत आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “आतापर्यंत रिसोडकरांना नियमित पाणीपुरवठा होत होता, मात्र आता परिस्थिती गंभीर बनली आहे. प्रत्येक नागरिकाने पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.”

शहरातील नागरिकांकडून सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागात फिरून पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी जनजागृती करावी, तसेच पाणी गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शहरात रिक्षाद्वारे ध्वनिक्षेपक लावून पाणी बचतीबाबत सूचना देण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे.

येत्या ८ ते १० दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर रिसोडकरांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे “पाणी वाचवा” हीच सध्याची सर्वात मोठी गरज बनली असून, नागरिकांनी पाणी जपून वापरणे अत्यावश्यक ठरत आहे.

Previous Post

‘सारथी महाराष्ट्राचा न्यूज’च्या पाठपुराव्यानंतर तेरणा महाविद्यालय परिसरातील फुटपाथ झाला मोकळा

Next Post

परळीत अफवेने पानटपऱ्यांवर सुकसुकाट; दिवसभर दुकाने बंद

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
3
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

परळीत अफवेने पानटपऱ्यांवर सुकसुकाट; दिवसभर दुकाने बंद

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In