• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमदार माऊली आबा कटके यांच्या विशेष शिफारशीतून शिरूर नगरपालिका शाळा क्र. १ ला ३ लाख रुपयांचे क्रीडा साहित्य

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
84
VIEWS
Ad 1

विद्यार्थ्यांच्या खो-खोतील उल्लेखनीय यशाची दखल; क्रीडा विकासासाठी मोठी मदत

पुणे प्रतिनिधी

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

शिरूर : शिरूर नगरपालिका शाळा क्र. १ च्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या विशेष शिफारशीनुसार पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत शाळेला तब्बल ३ लाख रुपये किमतीचे दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या क्रीडा साहित्याचे लोकार्पण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

सन २०२५ मध्ये पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित तालुकास्तरीय आंतरशालेय खो-खो स्पर्धेत शिरूर नगरपालिका शाळा क्र. १ चे मुलांचे व मुलींचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आणि उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. विद्यार्थिनींच्या या यशस्वी कामगिरीमुळे शाळेचा नावलौकिक वाढला असून क्रीडा क्षेत्रात शाळेची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत आमदार माऊली आबा कटके यांनी शाळेच्या क्रीडा विकासासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या शिफारशीनंतर पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने ३ लाख रुपयांचे क्रीडा साहित्य मंजूर केले. या साहित्यामध्ये खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, ऍथलेटिक्स तसेच विविध मैदानी खेळांसाठी आवश्यक असलेली आधुनिक व दर्जेदार साधने समाविष्ट आहेत.

क्रीडा साहित्याचे लोकार्पण नगराध्यक्ष ऐश्वर्याताई अभिजित पाचर्णे, शिक्षण समिती सभापती तथा उपनगराध्यक्ष मितेश गादिया, नगरसेविका आयेशा सय्यद, सुनीता पोटे, संगीता मालव, स्वाती साठे, नगरसेवक अभिजित पाचर्णे, निलेश गाडेकर, एजाज बागवान, सुनिल जाधव तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या उपक्रमासाठी शरद दुर्गे सर यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमास मच्छिंद्र गायकवाड सर व शरद दुर्गे सर यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात अधिक प्रोत्साहन मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

यावेळी आमदार माऊली आबा कटके यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीचे तसेच शिक्षकांच्या अथक परिश्रमांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक ते सहकार्य देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या क्रीडा साहित्य मंजुरीसाठी व उपलब्धतेसाठी सचिन जाधव, राजू लांघी सर आणि संपदा राठोड मॅडम यांनी सातत्याने पाठपुरावा करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या.

शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करणारे आमदार माऊली आबा कटके, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नगराध्यक्ष, शिक्षण समिती तसेच सर्व लोकप्रतिनिधी यांचे शाळा प्रशासनाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. तसेच या उपक्रमासाठी विशेष सहकार्य करणारे शरद दुर्गे सर यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

शिरूर नगरपालिका शाळा क्र. १ ही शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि विविध उपक्रमांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. ३ लाख रुपयांच्या या क्रीडा साहित्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळणार असून आगामी काळात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही शाळेचे विद्यार्थी यशाचा झेंडा फडकावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

“खेळाडू घडले तरच सशक्त राष्ट्र घडेल” या ध्येयाने प्रेरित होत शिरूर नगरपालिका शाळा क्र. १ क्रीडा क्षेत्रात नवे यश संपादन करण्यासाठी सज्ज झाली असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे.

Previous Post

भोकरदन-दानापूर मार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

Next Post

मुख्याध्यापक पी. व्ही. टेकले यांना ‘राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
3
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

मुख्याध्यापक पी. व्ही. टेकले यांना ‘राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In