• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; युवा क्रांती पोलीस मित्रांच्या कार्याचे पीआय किशोर परदेशी यांच्याकडून कौतुक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

शिरपूर | प्रतिनिधी :

शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर येथे युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात युवा क्रांती पोलीस मित्र शिरपूर तालुक्याची संपूर्ण टीम व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समाजसेवा, जनजागृती आणि नागरिकांच्या हितासाठी संघटना सातत्याने कार्यरत असून महाराणा प्रताप यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमास गिरीश मोरे, अशोक महाराज, गणेश बारी, नितीन कुवर, प्रवीण पाटील, चंद्रशेखर सोनवणे, ईश्वर कुंभार, चंद्रकांत गोपाळ, मयूर चौधरी, कृष्णा राजपूत यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेच्या आदर्शांवर प्रकाश टाकला.

यावेळी शिरपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांनी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “युवा क्रांतीची टीम अतिशय चांगले आणि समाजोपयोगी काम करत आहे. भविष्यातही असेच कार्य सुरू ठेवावे. समाजासाठी केलेले योगदान प्रेरणादायी आहे.”

त्यांच्या या गौरवोद्गारांमुळे उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, जनजागृती, पर्यावरण व नागरिक कल्याणाशी संबंधित विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि समाजसेवेचा संदेश देणारा ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन तसेच शिरपूर तालुका युवा क्रांती पोलीस मित्र टीमच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.

Previous Post

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या होमगार्ड जवानाच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत

Next Post

महायुतीच्या उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी शिवसेना सज्ज!

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
172
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
34
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
48
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
11
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
93
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post

महायुतीच्या उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी शिवसेना सज्ज!

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In